Saamana Editorial On Shinde-Fadnavis Government Saam tv
मुंबई/पुणे

Saamana Editorial On Shinde-Fadnavis Government: 'फडणवीसांच्या डरपोक सरकारने पळ काढला'; पाणी प्रश्नावरून दैनिक 'सामना'तून हल्लाबोल

Nitin Deshmukh Sangharsh Yatra : पाण्याच्या प्रश्नावरून दैनिक 'सामना'तून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Vishal Gangurde

Mumbai: राज्यात पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. अकोल्याती पाण्याच्या प्रश्नाविरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पाण्याच्या प्रश्नावरून दैनिक 'सामना'तून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 'फडणवीसांच्या डरपोक सरकारने पळ काढला, अशी टीका दैनिक 'सामना'तून टीका करण्यात आली. (Latest Marathi News)

अग्रलेखात काय म्हटलंय?

दैनिक 'सामना'तून ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाच्या नेत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, 'वास्तविक कामाचा डोंगर मंत्रालयात साचला आहे आणि देवेंद्र त्या डोंगरावर आक्रमण करीत आहेत हे खरेच आहे, पण त्या फायली नक्की कोणाच्या आहेत? रोजगार, पाणी, शेतकरी यांच्याबाबत त्या फायली आहेत काय? तिकडे अकोल्यातील पाणीप्रश्न पेटला आहे व त्या प्रश्नाची सोडवणूक करणारी फाईल देवेंद्र महोदय क्लीअर करायला तयार नाहीत'.

'विषारी पाण्याचे नमुने राज्यकर्त्यांच्या समोर ठेवायला लोकप्रतिनिधी जात असतील तर तो अपराध ठरतो काय? पण गुरुवारी पहाटे देशमुखांना अटक केली गेली, त्यांना नागपुरात प्रवेश करण्यापासून रोखले गेले. ही दडपशाही आहे. ठाकरे सरकारच्या काळात अकोल्यातील पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यात आला होता. मात्र अकोल्यासाठी मंजूर केलेली जलवाहिनी योजना मिंधे-फडणवीस सरकारने स्थगित केली, असा आरोप ठाकरे गटाने केली.

'फडणवीसांच्या डरपोक सरकारने पळ काढला. फडणवीस हे अकोल्याचे पालकमंत्री आहेत व अकोल्याची जनता एक-एक घोट पाण्यासाठी तडफडत आहे. खारे पाणी, जे विषारी आहे ते पिऊन दिवस ढकलत आहे. या पाण्यामुळे अनेक जण रोगाने बेजार झाले आहेत, पण पालकमंत्री फडणवीस टेबलावर फायलीचा डोंगर निर्माण करून सहय़ा करतानाचे स्वतःचे फोटो काढून घेत आहेत. अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या फायलींच्या ढिगाऱ्यात अकोला पाणीप्रश्नाची फाईल आहे काय? असा सवाल दैनिक 'सामना'तून करण्यात आला.

'पाणी मागण्यासाठी निघालेल्या आमदारांना अटक करणे म्हणजे डरपोक हुकूमशहाची दंडुकेशाही आहे. विदर्भातील नेतेच वैदर्भी जनतेचे खरे शत्रू आहेत. अशा राज्यकर्त्यांच्या घशात तेच खारे पाणी ओतायला हवे. नितीन देशमुखांचे तेच पाऊल होते. त्यांना अटक झाली, पण पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहील, अशा इशाराही ठाकरे गटाने दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT