Saamana Editorial on Mla Disqulification Case Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम नाही, खरा निकाल तिथेच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Mla Disqulification Case: "महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणजे ‘ट्रायब्युनल’ने दिलेला निर्णय अंतिम नाही. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय व जनतेचे न्यायालय आहे. निकाल तेथेच लागेल", असा विश्वास सामना अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

Satish Daud

Saamana Editorial on Mla Disqulification Case

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. तसेच, एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं नार्वेकर यांनी सांगितले. या निकालानंतर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजप, शिंदे गट आणि विधानसभा अध्यक्षांवर जोरदार टीका करण्यात आली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणजे ‘ट्रायब्युनल’ने दिलेला निर्णय अंतिम नाही. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) व जनतेचे न्यायालय आहे. निकाल तेथेच लागेल व खोकेबाजांची घराणी कायमची नष्ट होतील! ती वेळ दूर नाही. महाराष्ट्र रामशास्त्र्यांचा आहे. छ‘दाम’शास्त्र्यांचा नाही", असा हल्लाबोल सामना अग्रलेखातून करण्यात आला.

"महाराष्ट्राचा विचार व संस्कृतीचा वारसा महान आहे. त्या विचारांशीही संबंध नसलेले लोक महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री व त्यांचा मिंधे गट आज उन्मादाच्या नशेत आहे. ते घराणेशाहीवर बोलतात, पण गुलामगिरीचे पट्टे गळय़ात बांधून बेताल बडबडतात. त्यांचा उन्माद फार टिकणार नाही", असा घणाघात देखील सामना अग्रलेखातून करण्यात आला. (Latest Marathi News)

"देशाच्या सर्वोच्च न्यायालयास न जुमानता अशा माकडउडय़ा मारणे हीच हुकूमशाही आहे. त्याच हुकूमशाहीविरोधात देशात वातावरण तयार होत आहे. सरन्यायाधीशांनी दिलेल्या निर्देशांना हरताळ फासून महाराष्ट्रातील फुटीर आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय जनता मान्य करणार नाही", अशी टीका देखील सामना अग्रलेखातून करण्यात आली.

"विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना मुख्यमंत्र्यांच्या खोकेबाज गटाच्या हवाली केली. हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 106 मराठी हुतात्म्यांचा आणि सीमा प्रश्नासाठी बलिदान दिलेल्या 69 शिवसैनिक हुतात्म्यांचा अपमान आहे. अचानक खासदार झालेला श्रीकांत शिंदे हा आपला मुलगा नाही हे मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) जाहीर करावे व मगच घराणेशाहीवर टिचक्या माराव्यात", असा टोलाही सामनातून शिंदेंना लगावण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर ठोकले खिळे, अनेक वाहनांचे टायर फुटले; नेमका प्रकार काय? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT