Atal Setu Mumbai: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट; देशातील सर्वात लांब सागरी पुलाचे आज उद्घाटन

Atal Setu Mumbai Route: वाहतूककोंडीने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात लांब सागरी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
mumbai to navi mumbai new bridge
mumbai to navi mumbai new bridgeSaam TV
Published On

Mumbai Trans Harbour Link

वाहतूककोंडीने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात लांब सागरी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील 'अटल सेतू'चे उद्घाटन होणार आहे.

या सागरी पुलामुळे नवी मुंबई ते मुंबई प्रवास सुसाट होणार आहे. अटल सेतू हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात मोठा पूल आहे. या सेतूची लांबी तब्बल २१.८ किलोमीटर इतकी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

mumbai to navi mumbai new bridge
IMD Rain Alert: ढगाळ हवामानामुळे थंडी पळाली, देशातील ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा वेदर रिपोर्ट

विशेष बाब म्हणजे, पुलावर एकूण सहा लेन तयार करण्यात आल्या आहेत. अटल सेतूच्या बांधकामासाठी एकूण १७ हजार ८४० कोटी रुपये इतका खर्च आल्याची माहिती आहे. नवी मुंबई ते मुंबई प्रवासाचे अंतर कमी वेळात गाठता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०१६ साली अटल सेतू प्रकल्पाची पायाभरणी केली होती.

तब्बल ७ वर्ष या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून सेतू पूर्णपणे वाहतुकीसाठी तयार झाला आहे. अटल सेतूमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघ्या २० मिनिटात पार करता येणार आहे. याआधी हे अंतर पार करण्यासाठी दोन तास लागत होते. पुलावर वाहनांची वेग मर्यादा १०० किमी प्रतितास ठेवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

केवळ इंधनच नाही, तर प्रवासाचा वेळही वाचणार आहे. मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. अटल पुलामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील संपर्कातही सुधारणा होणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी अटल सेतू राष्ट्राला समर्पित केल्यानंतर पंतप्रधान मोदी मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी या पुलावरून प्रवास करतील. विशेष बाब म्हणजे, या पुलावरुन मोटारसायकल, ऑटोरिक्षा आणि ट्रॅक्टर यांना प्रवास करता येणार नाही.

mumbai to navi mumbai new bridge
Rashichakra: शनी-बुधाच्या युतीमुळे ३० वर्षांनी अनोखा योग; ५ राशींना होणार भरघोस फायदा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com