Saam TV Impact  Saam Digital
मुंबई/पुणे

Saam TV Impact : गर्भवतींचं पोषण की शोषण! गर्भवतींच्या शिध्यामध्ये आढळल्या अळ्या

Pune Zilla Parishad News : बातमी आहे आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराची, राज्याच्या महिला बाल कल्याण विभागाकडून गर्भवती महिलांना शिधा दिला जातो. मात्र या शिध्यात अळ्या सापडल्याचा प्रकार घडलाय. शिरूर तालुक्यात हा प्रकार घडलाय.

Sandeep Gawade

बातमी आहे आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराची, राज्याच्या महिला बाल कल्याण विभागाकडून गर्भवती महिलांना शिधा दिला जातो. मात्र या शिध्यात अळ्या सापडल्याचा प्रकार घडलाय. शिरूर तालुक्यात हा प्रकार घडलाय. यावरून आरोग्य विभाग गर्भवती महिलांचं पोषण करतंय की शोषण? असा सवाल उपस्थित होतोय.

गर्भवती महिलांचं कुपोषण होऊ नये, जन्माला येणारं बाळ सुदृढ असावं म्हणून शासनामार्फत अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना शिधा दिला जातो. मात्र हाच शिधा आता त्यांच्या जिवावर उठलाय असं म्हणण्याची वेळ आलीय. हे आम्ही अशासाठी म्हणतो कारण हे चित्र पाहिल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. काजू नीट निरखून पाहा. पोषणाच्या नावाखाली इथं तर गर्भवतींचं शोषण सुरूं आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील आंबळे गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. यातून आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय.

पुणे जिल्हा परिषदेच्या महिला-बालकल्याण विभागामार्फत हा शिधा देण्यात आला होता. अनुसूचित जाती-जमातीमधील गर्भवतींना हा शिधा दिला जातो. 7 महिन्यांच्या गर्भवतीपासून बाळ 5 ते 7 महिन्यांचं होईपर्यंत आहार पुरवला जातो. बाळ आणि मातेच्या आरोग्याची झीज भरुन निघेपर्यंत गर्भवती महिलांना 9 किलोचा शिधा दिला जातो. त्यात खोबरं, बदाम, खारीक, काजू, गूळ अशा 13 पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणात ठाकूर फुडस या कंत्राटदाराकडून हा निकृष्ट दर्जाचा शिधा पुरवण्यात आलाय.

शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार असो वा गर्भवतींना दिला जाणारा शिधा..कुठं अळ्या सापडतायेत तर कुठं निकृष्ठ दर्जाचं धान्य दिलं जातंय. त्यामुळे लाभार्थ्यांचं शोषण आणि कंत्राटदाराचं पोषण. हीच शासनाची भूमिका तर नाही ना? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होणं स्वाभाविक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT