Rupali Chakankar On Bandatatya Karadkar Saam Tv
मुंबई/पुणे

Rupali Chakankar On Bandatatya Karadkar: ते विधान संतापजनक, अशा प्रकारची प्रथा पडू शकते, कारवाई केलीच पाहिजे - रुपाली चाकणकर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिलीये.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात राजकीय वादंग निर्माण झाला. या निर्णयावरुन विरोधकांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला. तर, कीर्तनकार बंडातात्या कराडकरांची (Bandatatya Karadkar) या निर्णयावर टीका करताना जीभ घसरली. त्यांनी राज्यातील महिला नेत्यांबाबद वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यात नवा वाद उद्भवला. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिलीये (Rupali Chakankar Says Action Must Be Taken Against Bandatatya Karadkar).

ते विधान वादग्रस्त आणि संतापजनक - रुपाली चाकणकर

"ते विधान वादग्रस्त आणि संतापजनक आहे. याबाबत महिलांनी तक्रार केली, याची गंभीर दखल महिला अयोगाने घेतली असून त्यांच्यावर 48 तासात कडक कारवाई करावी असे आदेश देण्यात आले होते", असं म्हणत रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी बंडातात्या कराडांच्या वक्तव्यावर संताप दर्शवला आहे.

"त्यांनी माफी मागितली. वारकरी संप्रदाय प्रबोधनाचे काम करते. त्यांनी माफी मागितली असली तरी ते निंदननीय आहे. अशा प्रकारची प्रथा पडू शकते. त्यामुळे कोणीही अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे. आपल्या लेकींबद्दल असे वक्तव्य कधीच करत नाही. पोलिसांनी महिला आयोगाला दोन दिवसात लेखी अहवाल दयावा", असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

ह.भ.प बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यातील महिला नेत्या (leaders) मद्य प्राशन करतात असं वक्तव्य बंडातात्या कराडकरांनी केले होते. या आंदोलनात बंडातात्यांनी पोलिसांवर (police) देखील मास्कवरुन टीका केली होती. गुरुवारी रात्री उशिरा बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल झाला होता.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT