रुपाली चाकणकरांनी केला प्रवीण दरेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल Saam Tv
मुंबई/पुणे

रुपाली चाकणकरांनी केला प्रवीण दरेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल

भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होत.

अमोल कविटकर, पुणे

अमोल कविटकर

पुणे ; भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर Pravin Darekar यांनी राष्ट्रवादीवर NCP टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होत. पुण्यातील Pune एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवरून टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यांच्या त्या विधानावर पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

गुन्हा दाखल;

शिरूरमध्ये राष्ट्रवादीवर टीका करताना जीभ घसरलेल्या विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. दरेकर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा दखलपात्र असला तरी जामीनपात्र आहे.

काय म्हणले होते प्रवीण दरेकर;

पुण्यात आयोजित रामोशी समाजाच्या मेळाव्याला काल प्रवीण दरेकरांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली होती. " या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी घणाघाती टिका प्रवीण दरेकरांनी यावेळी केली होती. शिरूरमध्ये राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त 'जय मल्हार क्रांती संघटने'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला दरेकर उपस्थित होते, यावेळी बोलतानाच त्यांनी हे वक्तव्य केलं होत.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर;

विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे जाहीर सभेमध्ये बोलत असताना अतिशय अश्लील असे विधान केले. आपण जाहीर सभेत बोलत असताना महिलांना लज्जा वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं होत. त्या दिवसापासून आजपर्यंत राज्यात महिलांनी त्या वक्त्याबद्दल निषेध व्यक्त केला. पण जणाची नाही मनाची असावी म्हणून त्यांनी माफी मागणे अपेक्षित होत पण तस काही झालं नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes skin symptoms: त्वचेवर दिसतात ही ७ लक्षणं, लगेच व्हा सावध, कधीही कंट्रोल न होणारा डायबेटिस होण्याचा धोका

चंद्रपूर किडनी रॅकेट प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य सूत्रधाराला सोलापुरातून अटक|VIDEO

Sleep Tips: तुमच्या शरीराला किती वेळ झोप आवश्यक आहे? वय किती, तास किती जाणून घ्या

Maharashtra Live News Update: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; या तारखेला करणार युतीची घोषणा

Gas Geyser : बाथरूममध्ये जोडप्याचा मृत्यू,पत्नी निर्वस्त्र आढळली, तर नवरा....; मृतदेह काढण्यासाठी तोडला दरवाजा

SCROLL FOR NEXT