मुंबई/पुणे

रुपाली चाकणकर, सुनील तटकरेंच्या बोटाला दुखापत कशी झाली? विरोधकांचा दावा काय? त्यावर कोण काय म्हणालं?

sunil tatkare and rupali chakankar : रुपाली चाकणकर, सुनील तटकरेंच्या बोटाला दुखापत कशी झाली, यावर दोघांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं

सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप

अंधारे यांच्या आरोपांना सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकरांकडून प्रत्युत्तर

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. भोंदूबाबा अशोक खरात याची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही भेट घेतली होती. तर रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला गुरू जाहीर केलं होतं. आता भोंदूबाबाचे काळे कारनामे समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अघोरी कृत्यासाठी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांनी बोट कापल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सुषमा अंधारे यांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांच्या आरोपांना उत्तर दिलं. रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या समर्थकांचा व्हिडिओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या बोटाला झालेली दुखापत अपघातामुळे झाल्याचा दावा चाकणकर समर्थकांनी केला. पुण्यातील धायरी भागातील एका गणेश मंडळाने हा दावा केलाय.

गणेश मंडळाने पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, 'रुपाली चाकणकर या मंडळात आरती करण्यासाठी येत होत्या. त्यावेळी गाडीतून उतरत असताना त्यांचं बोट कारच्या दरवाजात अडकले. त्यामुळे त्यांना दुखापत झाली.त्यावेळी टिश्यू पेपर लावून रुपाली चाकणकर या सहभागी झाल्या होत्या'. या गणेश मंडळातील समर्थकांचा व्हिडिओ रुपाली चाकणकर यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रुपाली चाकणकर यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील बोटाला झालेल्या जखमेबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. माझं देखील बोट गाडीच्या दरवाजात चेपल्यामुळे जखम झाली होती,असं तटकरे यांनी म्हटलं. रूपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांचे फोटो अनामिका कापलेले व्हायरल होऊ लागले आहे. त्यात दोघांनी दिलेलं कारण एकच असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर दोघांची कारणे एकच असल्याने टीका देखील होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

Election : ३ राज्यांमध्ये पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर; मतदान आणि निकाल कधी?

पावसाळ्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! फक्त या 5 स्टेप्स करा फॉलो| Glowing Skin Tips

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची माहिती, बँक खात्यात ३००० रुपये जमा होणार? वाचा

Pune Crime: नगरपरिषद कार्यालयाबाहेरच विरोधी पक्षनेत्यावर चाकू आणि चॉपरनं जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT