Pune Metro News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Metro News : पुणेकरांसाठी खुशखबर; रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो प्रवास आजपासून सुरू

Ruby Hall To Ramwadi Metro : २ वर्षांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होत. यावेळी ते स्वत: पु्ण्यात उपस्थीत राहिले होते. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदी उद्घाटन करणार आहेत.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे

पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. अशात आज या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होत आहे. २ वर्षांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होत. यावेळी ते स्वत: पु्ण्यात उपस्थीत राहिले होते. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदी उद्घाटन करणार आहेत.

पहिल्या टप्प्यात वनाझ ते रुबी हॉल असा 9.7 किमीचा मार्ग सुरु करण्यात आला होता. आज याच मार्गाचा पुढील टप्पा म्हणजे रुबी हॉल ते रामवाडी या 5.5 किमीच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होत आहे. या सेहळ्यासाठी रुबी हॉल मेट्रो स्थानक फुलांनी सजवण्यात आलं आहे. भव्य सजावट केल्याने रुबी हॉल मेट्रो स्थानकाची शोभा आणखी वाढलीये. रुबी हॉल ते रामवाडी हा मार्ग आज दुपारी १२ नंतर पुणेकरांसाठी खुला करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर या मार्गाचे आतुरतेने वाट पाहत होते. प्रवासासाठी ट्रेनची सुविधा नसल्याने नागरिकांना बायरोड प्रवास करावा लागत होता. यामुळे मार्गवाढवूनही वाहतूक कोंडी सुटता सुटत नव्हती. रोजच्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांना वाट काढत कामावर जावे लागत होते.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणही मोठ्याप्रमाणावर वाढले होते. मात्र आता रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू झाल्याने नागरिकांची या सर्व त्रासातून सुटका होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरे बंधु एकत्र आले तरी त्यांचा पराभव निश्चित आहे - मंत्री जयकुमार गोरे

निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा एल्गार; 'या' दिवशी आयोगाविरोधात काढणार विराट मोर्चा|VIDEO

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

SCROLL FOR NEXT