पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरटीओने सोमवारी अपघातग्रस्त कारची तपासणी पूर्ण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तपासणीत कारमध्ये कुठलाही बिघाड आढळून आला नाही. याचाच अर्थ ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी कारमध्ये कुठलाही बिघाड झालेला नव्हता.
आरटीओसोबतच पोर्शे कंपनीच्या इंजिनिअरच्या पथकानेही कारची तपासणी केली आहे. या तपासणीतही कारमध्ये कुठलाही बिघाड आढळून आला नाही. याबाबतचा अंतिम अहवाल आता दोन ते तीन दिवसांत पोलिसांकडे सादर केला जाणार आहे.
दरम्यान, पोर्शे कारच्या तपासणीतून अपघाताचे आणखी नवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहे. कारच्या कॅमेऱ्याच्या चित्रीकरणातून अपघात कसा झाला, हेही स्पष्ट होणार आहे. इलेक्ट्रॉनिक डेटासह पुढील आणि मागील बाजूच्या कॅमेऱ्यातील चित्रीकरण ताब्यात घेण्यात आलं आहे.
चालकाने कारचा ब्रेक किती वेळा दाबला? अपघातावेळी मोटारीचा वेग किती होता? किती वेळा ॲक्सिलेटर देण्यात आला? या बाबी देखील स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉक्टरांना न्यायालयाने ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
डॉक्टर अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर, अशी आरोपी डॉक्टरांची नावे आहेत. मात्र, पोलीस कोठतीच श्रीहरी हळनोर याची तब्येत बिघडली आहे. त्याला सध्या इन्फेक्शनचा त्रास होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोठडीतच त्याच्यावर प्राथामिक उपचार करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.