Railway CCTV Saam TV
मुंबई/पुणे

CCTV Footage: धावत्या रेल्वेतून खाली पडणाऱ्या महिलेचे RPF जवानाने वाचवले प्राण, पाहा घटनेचा थरारक VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> संजय गडदे

मुंबई : लोकल ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवेश करताना किंवा गाडीतून खाली उतरत असताना नागरिक अनेकदा घाई करतात आणि त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. नेहमीच रेल्वे स्थानकात प्रवाशांना काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या जातात.

मात्र असे असतानाही नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वेतून खाली उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात. आता असाच एक प्रकार मुंबईच्या दहिसर रेल्वे स्थानकातून समोर आला आहे. सुदैवाने या महिला प्रवाशाचे प्राण आरपीएफ जवानाने वाचवले आहेत.

आरपीएफ जवानाने एका महिलेचे प्राण वाचवल्याची घटना पश्चिम रेल्वेच्या दहिसर रेल्वे स्टेशनवर घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 22 फेब्रुवारी रोजी रेल्वे दहिसर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर विरारच्या दिशेने जाणारी लोकल आली असता एक महिला प्रवासी चालत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या तोल मागच्या बाजूला गेला. (Latest News)

महिला चालत्या ट्रेनमधून पडत असल्याचं कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानाने पाहिलं आणि त्यांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. आरपीएफ जवानांनी त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढले त्यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली असून या घटनेनंतर त्या आरपीएफ जवानाचे कौतुक केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT