Political News: नवं सरकार येण्यामागे अदृष्य हात, चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट

शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असं कधीही वाटू शकत नाही.
Chandrashekhar Bavankule
Chandrashekhar Bavankulesaam tv
Published On

पुणे : राज्यात नवीन सरकार येण्यामागे येण्यामागे अदृष्य हात असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र ते हात कोणते याचा उलगडा त्यांनी केला नाही. मात्र बावनकुळे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

तसेच अजित पवार राष्ट्रवादी ताब्यात घेतील या भीतीने शरद पवारांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे. तसेच येत्या ८ महिन्यात उद्धव ठाकरेंकडे ४ आमदार राहतील असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Chandrashekhar Bavankule
Devisingh Shekhawat Passed Away: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

पहाटेच्या शपथविधीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असं कधीही वाटू शकत नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री नको अशीच भूमिका शरद पवारांची राहिली आहे. देवेंद्रजींचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजप मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आला. आधी १२४ नंतर १०५ आमदार देवेंद्रजींच्या नेतृत्वात निवडून आहे. मात्र राष्ट्रवादीला ७० आमदार देखील निवडून आणता आले नाही.

(Political News)

Chandrashekhar Bavankule
Jitendra Awhad News: जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; करमुसे मारहाण प्रकरणातील तपास ३ महिन्यात पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

मग अशावेळी फडणवीस मुख्यमंत्रीपदी बसले, तर १५ वर्ष भाजपचं सरकार राज्यातून जाणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला संधीच मिळणार नाही. त्यामुळे सतत ते फडणवीसांविरोधात बोलत असतात. आजच्या राजकारणातील सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्त्व देवेंद्र फडणवीस आहेत. मात्र पवार साहेबांना का चालत नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये यासाठी पवार साहेबांचे प्रयत्न सुरु असतात, असं बावनकुळे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com