Rohit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar News: 'रोहित पवारांना पहिलं तिकीट ब्लॅकमेलिंग करून मिळालं', भाजप आमदार राम शिंदेंचा दावा

MLA Ram Shinde On Rohit Pawar: 'रोहित पवारांना पहिलं तिकीट ब्लॅकमेलिंग करून मिळालं', भाजप आमदार राम शिंदेंचा दावा

Satish Kengar

>> सुशील थोरात

MLA Ram Shinde On Rohit Pawar:

अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याआधीच आमदार रोहित पवार भाजपात जाण्याच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट केला होता.

या वक्तव्याला भाजप आमदार राम शिंदे यांनी दुजोरा देत आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिले राजकीय तिकीट ब्लॅकमेल करूनच मिळवल्याचं राम शिंदे यांनी म्हंटलंय.

ते म्हणाले आहेत की, 2017 साली त्यांनी राष्ट्रवादीला धमकी दिली होती. जिल्हा परिषदेचे तिकीट देता की, मी भाजपात जाऊ. तसेच रोहित पवार यांनी 2019 साली हडपसरसाठी भाजपकडं तिकीट मागितलं हो,तं असं भाजप आमदार राम शिंदे यांनी म्हटलंय. (Latest Marathi News)

रोहित पवार हे भाजपाच्या तिकिटासंदर्भात तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे हडपसर आणि शिवाजीनगर विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी गेले होते असं राम शिंदे म्हणाले.

अजित पवार हे 30 वर्षापासून राजकारण करताय त्यामुळे ते नेते झाले. आपल्यात तेवढी क्षमता आहे का? हे ओळखून वक्तव्य करावं, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावलाय. तर कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही, असा खोचाक सल्लाही त्यांनी रोहित पवार यांना दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT