Rohit Pawar
Rohit Pawar  saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar News : शासकीय आश्रमशाळेत कोट्यवधींचा दूध घोटाळा, रोहित पवार यांनी फाईलच दाखवली

साम टिव्ही ब्युरो

नितीन पाटणकर | पुणे

Rahit Poawar News :

राज्यातील शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका निनावी व्यक्तीने आपल्याला एकूण ११ फाईल पाठवल्या असून सत्ताधारी पक्षाचाच हा माणूस असं रोहित पवारांनी म्हटलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोहित पवारांनी पुढे म्हटलं की, मला पाठवण्यात आलेल्या ११ पैकी दोन फाईल मी आता दाखवत आहे. पहिली फाईल आदिवासी आश्रमशाळेतील दुध पुरवठ्याची आहे. ⁠आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना २०० मिली दूध पुरवले जाते. या दूध पुरवठ्यासाठीचा ⁠पहिला करार २०१९ मध्या झाला आहे. या करारात ४६.४९ रुपये दर होता. चितळे, महानंद, अमूल दूधाचे दर ४९.७५ रुपये होते. त्या दराने दुध पुरवठा होत होता.

राज्यात ५५२ आश्रमशाळा आहेत. आदिवासी समाजातील लहान मुलं तिथे शिकतात. मात्र ⁠२०२३-२४ मध्ये मात्र हा दर १४६ रुपये दर झाला आहे. १६४ कोटी रुपयांचे हे टेंडर आहे. एवढ्या महागड्या दराने दूध खरेदी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी करत आहे. यामध्ये ८० कोटी रुपयांचं कमिशन दिलं गेलं आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. विकास करण्यासाठी तिकडे गेले, असं सांगणाऱ्यांनी हाच विकास करण्यासाठी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्याकडून ३० रुपये दराने घेतलेले दूध गरीबांच्या मुलांना १४६ रुपये दराने दिले जात आहे. ⁠या विरोधात पीएमओ, सीएमओ, ॲन्टीकरप्शनकडे तक्रार देणार आहे. ⁠पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील खाजगी दूध डेअरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याच्या दूध संघाला हे काम दिले आहे, असं देखील रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक पेपरफुटी; पावसाळी अधिवेशनापूर्वी फडणवीसांचा गंभीर आरोप, VIDEO

Vijay Wadettiwar Video: महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरून सत्ताधाऱ्यांना घेरणार, वडेट्टीवारांचा इशारा

Manoj Jarange Patil: पुण्यात मनोज जरांगे-पाटील घेणार भव्य सभा; पुढील दिशा काय असणार?

Coriender Benifits: फक्त किडनीच नाही तर 'या' आजारांवर देखील ठरेल फयदेशीर कोथिंबीर

Maharashtra Lagislatitve Councial Election: नाशिक शिक्षक मतदारसंघात मविआचे अमेदवार संदीप गुळवे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, पाहा Video?

SCROLL FOR NEXT