Crime News
Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Crime News : नालासोपारा येथे बंदुकीच्या धाकावर सराफच्या दुकानात लूट

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Nalasopara Crime News - नालासोपारा पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत शनिवारी एका अज्ञात इसमाने बंदुकीच्या धाकावर सराफच्या दुकानात लूट करून 15 तोळ्याचे दागिने घेऊन आरोपी फरार झाला आहे. नालासोपारा (Nalasopara) पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी चार पथके निर्माण केली आहेत.नालासोपाराच्या पश्चिमेला असलेल्या पाटणकर परिसरातील नेकलेस ज्वेलरचे दुकान आहे. या दुकानात साधारण 25 वर्ष्याचा इसम आला होता. त्याने दुकानदाराला सोन्याचे नाणी विकत घ्यायचे असल्याचे सांगितले.

दुकान मालकाने सोन्याची नाणी विकत नसल्याचे सांगितले. यावेळी माझ्या बहिणीला सोन्याचे दागिने सुद्धा खरेदी करायचे आहेत म्हणून इतर सोन्याचे दागिने दाखवा असे सांगत दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि दरम्यान खिस्यातील पिस्तूल काढून दुकानदाराला पिस्तूलचा धाक दाखवत दागिने लुटण्यास सुरवात केली. पण या इसमाच्या हातातील पिस्तूल नकली असल्याचे जेव्हा दुकानदाराला लक्षात आले, तेव्हा त्याने त्याला विरोध केला.

दोघांमध्ये झाटापटी झाली, आणि चोराने दुकानदाराला ढकलून दुकानातून पोबारा केला. यावेळी त्याने 15 तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याचे दुकानदाराने पोलीस फिर्यादित सांगितले आहे. याबाबत माहिती देताना नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी माहिती दिली की, लुटारू इसम तोंडावर मास्क लावून आला होता, त्याने त्याची बहीण येणार असल्याचे सांगत दुकानात अर्धा ते पाऊण तास काढला जेव्हा दुकानात दुकान मालकसह कुणी नसल्याचे पाहत के कृत्य केले आहे. पोलिसांनी घटना स्थळावरून सिसिटीव्ही ताब्यात घेतले असून आरोपीचा शोध सुरु आहे असे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'श्री' का लिहतात? हे फायदे वाचा

Balasaheb Thorat: कृपा करा; ३ लाखाच्या लीडची चर्चा करु नका... बाळासाहेब थोरातांचा ठाकरेंच्या उमेदवाराला सुचक सल्ला

NCP News: मजबुरीही नाही, तडजोड तर बिलकुलच नाही! Ajit Pawar यांचं मोठं विधान

PM Modi Sabha in Madha: ....म्हणून त्या नेत्याची इथून निवडणूक लढवण्याची हिंमत नाही; PM मोदी कुणावर बरसले?

Chhatrapati Sambhajinagar | विद्यापीठात PF घोटाळा ? नेमका विषय काय?

SCROLL FOR NEXT