MMRDA ने मंजूर केलेले रस्ते कुठल्या सालचे : आ.राजू पाटील प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

MMRDA ने मंजूर केलेले रस्ते कुठल्या सालचे : आ.राजू पाटील

प्रदीप भणगे

डोंबिवली : कल्याण-शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणी मनसे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना त्रुटी दाखवल्या आणि काही सूचना केल्या. तसेच पलावा ते रिजन्सी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी मनसे आमदार पाटील यांनी खासदारांना टोला हाणला आमदार म्हणाले की एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते कुठल्या सालचे आहेत, त्याची माहिती काढा. ३६० कोटी मंजूर झाले आहेत. पण त्याच्या नुसत्या मंजुऱ्या येतात, त्याचे होर्डिंग लागतात, पण काम कधी सुरू होणार?

कल्याण–शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यातच रस्त्याला खड्डे पडले आणि तडे सुद्धा गेले आहेत. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले. तसेच पलावा ते सुयोग हॉटेल चौकापर्यंतच्या मार्गावर 3 महत्वाचे जंक्शन्स आहेत. कुशाला हॉटेल, मानपाडा चौक आणि सुयोग हॉटेल चौक या तिन्हीठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीला कारणीभूत असणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्याच्या सूचना आपण यावेळी एमएसआरडीसी अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना मनसे आमदार पाटील यांनी केल्या. 

हे देखील पहा -

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की या रस्त्याचा आम्ही दर महिन्याला पाहणी दौरा करत असतो. काही ठिकाणी काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्या निदर्शनास आणून देत असतो. तुम्ही तसं पाहाल तर या रस्त्याचं काम खूप स्लो सुरू आहे आणि प्रत्येक वेळेस बोंबा मारून पण थोडा थोडा फरक पडतो. आम्ही दहा गोष्टी सांगितल्या की एखादी गोष्ट मान्य होते. आज पण आम्ही पलावा जंक्शन पासून सुयोग हॉटेल पर्यंत पाहणी केली. यात तीन जक्शन आहेत, या ठिकाणी खूप वाहतूक कोंडी होते.

एमएसआरडीएचे अधिकारी, ठेकेदार, इंजिनियर्स, वाहतुक पोलीस यांना सोबत घेऊन दौरा केला आहे आणि इथे असे निदर्शनास आले की, इथे काही ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड आहेत. त्या चौकातील रस्ता खराब आहे. तो जर मॉर्टेबल केला तर गाड्या चांगल्या फ्लो ने पुढे गेल्या तर बऱ्या पैकी वाहतूक कोंडी कमी होईल. काही सूचना मी त्यांना केल्या आहेत. बघूया या आठवड्यात काय करतात. मला वाटतंय पुढच्या आठवड्यात बऱ्यापैकी वाहतूक कोंडी कमी होताना दिसून येईल, असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला.

एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्त्याबाबत मनसे आमदार काय बोलले ते वाचा :

एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते कुठल्या सालचे आहेत, त्याची माहिती काढा. ३६० कोटी मंजूर झाले आहेत. पण त्याच्या नुसत्या मंजुऱ्या येतात, त्याचे होर्डिंग लागतात, पण काम कधी सुरू होणार? आम्ही दिलेले रस्ते ही ते त्यांच्या नावाने खपवतात. परंतु ती काम तर सुरू करा. एमआयडीसी मधील ११० कोटी रुपयांचे बॅनर लागलेले झाले का काम चालू ? मानपाडा रोडबाबत अशोक चव्हाण साहेबांकडे जाऊन रस्ता मंजूर करून आणला त्यांचं स्पष्ट पत्र देखील माझ्याकडे आहे. पण मला त्या श्रेयाच्या लढाईत पडायचे नाही, लोकांना माहिती आहे आमच्या इथल्या कोणी काय केलं.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT