बीडच्या रिक्षा चालकाच्या चिमुकल्या मुलाची मेंदूच्या आजारासह निमोनियाशी झुंज

खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, मात्र उपचारासाठी पैसे नाहीत. दानशूरांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन
बीडच्या रिक्षा चालकाच्या चिमुकल्या मुलाची मेंदूच्या आजारासह निमोनियाशी झुंज
बीडच्या रिक्षा चालकाच्या चिमुकल्या मुलाची मेंदूच्या आजारासह निमोनियाशी झुंजविनोद जिरे
Published On

बीड - बीडच्या नेकनूर येथील निलेश मोरे या रिक्षा चालकाच्या चिमुकल्या मुलाची, 'मेंदूरज्जू व निमोनियाशी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात झुंज सुरू आहे. घरची असणारी हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच कुटुंबावर आलेलं हे संकट! या चिमुकल्याच्या महागड्या उपचारासाठी मोरे यांच्याकडे आता पैसेच नाहीत. त्यामुळे समाजातील दानशूरांनी पुढे येऊन आर्थिक मदत करावी. असे कळकळीचे आवाहन निलेश मोरे यांच्या कुटुंबीयांनी केले आहे .

हे देखील पहा -

विराज निलेश मोरे वय 3 वर्ष असे उपचार घेत असलेल्या रिक्षा चालकाच्या चिमुकल्या मुलाचे नाव आहे. निलेश मोरे हे भूमिहीन असून रिक्षा चालवून कुटूंब चालवतात. गेल्या महिन्यात मुलाला अचानक ताप आल्याने बीड येथे उपचार सुरू होते. मात्र मुलाचा ताप वाढतच गेल्याने त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

बीडच्या रिक्षा चालकाच्या चिमुकल्या मुलाची मेंदूच्या आजारासह निमोनियाशी झुंज
निवृत्तीवेतनासाठी मृतदेह तहसील कार्यालयासमोर आणला

तेथे त्याच्यावर अमृत बाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या 4 दिवसांपासून तो व्हेंटिलेटरवर आहे. त्याच्या उपचारासाठी प्रतिदिवस 25 ते 30 हजार रुपये खर्च येत आहे. त्याचा संपूर्ण खर्च डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अंदाजे ३ ते ४ लाखापर्यंत होईल म्हणून सांगितले आहे. त्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे, समाजातील दानशूरांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मदतीसाठी बँक खाते माहिती

शैलेश मोरे यांचा बँक तपशील

फोन पे/ गुगल पे :- 8657163016

अकाऊंट नंबर:- 62171192864

IFSC Code:- SBIN0020406

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com