Viral News Saam Tv
मुंबई/पुणे

Viral News : Valentine Day च्या दिवशीच मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; VIDEO तुफान व्हायरल

प्रेम व्यक्त करण्याच्या दिवशी तरुणीने आणि तिच्या आईने दिला रोड रोमियोला चोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन इंगळे

Nalasopara Viral News : नालासोपाऱ्यातील आचोळे रोड येथे मुलीची छेड काढणाऱ्या एका रोड रोमियोला तरुणीने आणि तिच्या आईने भर रस्त्यात कायमची अद्दल घडवली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आज व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र पोरींची येता-जाता छेड काढणाऱ्या रोडछाप रोमियोंची काही कमी नाही. काही मुली हा त्रास सहन करतात, पण काही मुली सहन न करता त्या रोड रोमियोला कायमची अद्दल घडवतात.

व्हॅलेंटाईन डेला काहीतरी तुफानी करते हैंच्या आवेशात गेलेल्या अशाच एका रोड रोमियोला चांगलेच महागात पडले आहे. नालासोपाऱ्यात मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणला भर रस्त्यात बेदम चोप देण्यात आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

नालासोपारा (Nalasopara) पूर्व आचोळे रोड डॉन लेन परिसरात मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला तरुणीने आणि तिच्या आईने चांगलीच मारहाण केली. या मुलीने आणि तिच्या आईने या तरुणाला लाथा बुक्क्यांनीही मारल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी संगितलं. पीडित मुलगी आणि तिची आई या तरुणाला मारहाण करतानाचा सर्व प्रकार एका मोबाईल कैमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.

दरम्यान, तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कोणतीही नोंद झाली नाही. या परिसरात मुलींची रोजच छेड काढली जाते, अशा प्रकारची टवाळकी करणाऱ्या तरुणांनी या परिसरात उच्छाद मांडलाय, अशी तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे मुलींची छेड काढण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांनी अशा रोड रोमियोंना कायमची अद्दल घडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यात गावबंधाची हाक

Shocking : लँडिंगवेळी विमानाचा टायर फुटला; दिल्लीहून भरलं होतं उड्डाण, विमानतळावर खळबळ

Green chilli health risks: या 6 व्यक्तींनी चुकूनही हिरवी मिरची खाऊ नये; लगेच बिघडू शकते तब्येत

गुन्हेगारीपासून दूर, नव्या आयुष्याकडे वाटचाल; पुणे पोलिसांकडून ५० विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी सिंहगडावर विशेष पुनर्वसन उपक्रम

sugar sale rules : मोदी सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय; साखर विक्रीच्या नियमात बदल करणार, साठेबाजीला चाप

SCROLL FOR NEXT