Rishikesh Vaidya Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: स्वयंघोषित 'बाबा' ऋषिकेश वैद्यला पोलिस कोठडीत करायचीय पूजा; साहित्य आणि पुस्तकांची कोर्टाकडे मागणी

Rishikesh Vaidya Case: स्वयंघोषित बाबा ऋषिकेश वैद्य प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. ऋषिकेश वैद्यला पोलिस कोठडीत करायचीय पूजा करायची आहे. त्यासाठी त्याने साहित्य आणि पुस्तकांची कोर्टाकडे मागणी केली आहे.

Priya More

Summary -

  • स्वयंघोषित बाबा ऋषिकेश वैद्य प्रकरणात नवी अपडेट

  • ऋषिकेश वैद्यलापोलिस कोठडीत पूजा करण्याची आहे

  • त्याने कोर्टाकडे पूजेसाठी साहित्य आणि पुस्तकं मिळावी अशी मागणी

  • कोर्टाने त्याची मागणी फेटाळून लावली

अक्षय बडवे, पुणे

'मी महादेवाचा अवतार आहे आणि तू पार्वती आहे' असं म्हणत महिलेवर अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित बाबा ऋषिकेश वैद्य प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या ऋषिकेश वैद्यने कोर्टाकडे एक अजब मागणी केली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या ऋषिकेश वैद्यला धार्मिक पूजा आणि अर्चना करायची आहे. त्यासाठी त्याने कोर्टाकडे साहित्य आणि पुस्तकं मिळावी अशी मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश वैद्यने पोलिस कोठडीत पूजा अन् अर्चना करता यावी म्हणून कोर्टाकडे विनंती केली. धार्मिक पूजा, अर्चना करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पुस्तकं मिळावी अशी मागणी त्याने केली आहे. पण कोर्टाने त्याने केलेली मागणी फेटाळून लावली. स्वयंघोषित धर्मगुरु ऋषिकेश वैद्य याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप आहे. कोर्टाने ऋषिकेश वैद्यला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रकरण असं आहे की, ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित धर्मगुरूविरोधात एका महिलेने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पीडित महिला ३५ वर्षांची असून ती पुण्यात राहते. हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी ऋषिकेश वैद्यला पिंपरी येथून अटक केली.

हे प्रकरणी २०२३ मधील आहे. पुण्यात राहणारी पीडित महिलेची वसईमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित धर्मगुरूशी ओळख झाली. ऋषिकेश वैद्यने या महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी डिसेंबर २०२३ ला पुण्यात आला होता. यावेळी मांजरी येथील एका लॉजवर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याने तिला गुंगीचे औषध देत हे भयंकर कृत्य केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT