अबब! रिक्षा चालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड; वाहतूक पोलिसांचा अजब कारभार SaamTvNews
मुंबई/पुणे

अबब! रिक्षा चालकाला हेल्मेट न घातल्याचा दंड; वाहतूक पोलिसांचा अजब कारभार

कल्याण शहरात राहणाऱ्या गुरुनाथ चिकणकर नावाच्या एका रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी ५०० रुपयांचा दंड आकाराला आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण शहरात राहणाऱ्या गुरुनाथ चिकणकर नावाच्या एका रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी ५०० रुपयांचा दंड आकाराला आहे. मुंबईच्या (Mumbai) कांदिवली भागात ०३ डिसेंबर २०२१ रोजी एक दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत होता, त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला, त्याचे हे चलन असल्याचे समोर आले आहे. मात्र, आता या दुचाकी चालकाचा दंड ऑनलाइन प्रणालीच्या ई-चलन द्वारे रिक्षा चालक गुरुनाथ यांना आकारण्यात आला आहे.

हे देखील पहा :

सुरुवातीला मोबाईल वर या दंडा (Fine) संबंधी माहिती आल्यानंतर रिक्षा चालक (Rickshaw Driver) गुरुनाथला धक्काच बसला. त्यांनी या प्रकरणी कल्याण (Kalyan) वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, माझी चूक नसतांना मी ठाणे येथे का जावे, वाहतूक पोलिसांनी केलेली चूक त्यांनी सुधारून द्यावी अशी मागणी गुरुनाथ ने केली आहे. या सगळया प्रकरणामुळे गुरुनाथला मानसिक त्रास झाला आहे.

आता या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला आलेला दंड आणि नोटीस रद्द करण्याची मागणी रिक्षा चालकाने केली आहे. तर, वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) आपल्या ई-चलन पध्दतीत काम करताना निदान वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यालाच दंड आकारला जातो आहे का? याची माहिती नीट तपासून संबंधीताचा मोबाईल वर दंड पाठवावा, अन्यथा अनेकांना या ई चलन प्रणालीचा नाहक त्रास होणार असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालकाचे नातेवाईक मदन चिकणकर यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT