malingaon saam tv
मुंबई/पुणे

Malin Incident : पहाटेच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळली, माळीणकरांची चिंता वाढली

नव्यानं माळीण गावचं पुनर्वसन झालं. रस्ते, घरं सुसज्य बांधण्यात आली तेथेच ही घटन घडली.

रोहिदास गाडगे

Malingaon News : माळीण दुर्घटनेनंतर पुनर्वसन झालेल्या ठिकाणी आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या परिसराची संरक्षण करणारी सरंक्षण भिंत कोसळली. दरम्यान आजही परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे. (Maharashtra News)

नव्याने माळीण गावचे पुनर्वसन झालेल्या गावच्या मध्यावर रस्ते आणि घरांना संरक्षण मिळावे यासाठी कॉक्रिटमध्ये बांधण्यात आलेली हाेती. ही भिंत १० फुट उंच आणि ५० फुट लांबीची आहे. ही भिंत कोसळल्याने घरांच्या बाजुचा मातीचा भरावही मोकळा झाला आहे.

संरक्षण करणारी भिंत खचल्याने तसेच अजून येथे पाऊस सुरु असल्याने धोका कायम असल्याने शासकीय यंत्रणांनी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची भिती व्यक्त होत आहे.

नव्यानं माळीण गावचं पुनर्वसन झालं. रस्ते, घरं सुसज्य बांधण्यात आली. या गावाला आणि घरे रस्त्यांना कॉक्रिटमध्ये संरक्षण भिंती उभारण्यात आली. ज्या भिंती माळीण संरक्षण करत आहे त्याच भिंती कुचकामी ठरत असल्याने माळीणकरांचे (villagers) वास्तव्य सुरक्षित आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतं

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : खोटं कारण देऊन निर्जनस्थळी नेलं, १३ वर्षीय मुलीवर भावाने केले अत्याचार, २ मित्रांचाही हात

अकोल्यात भाजपची मोठी खेळी, 'या' पक्षाला झटका; सलग २ वेळा विजयी झालेल्या नेत्याची भाजपात एन्ट्री

Akshay Kelkar : तारीख ठरली! अक्षय केळकरची हॉरर मालिका 'या' दिवशी होणार सुरू, वेळ आताच नोट करा

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फीचर! आता स्क्रिन शेअर करता येणार; कसं वापरायचं?

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

SCROLL FOR NEXT