मुंबई : मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी राज्यसरकारणे लॉकडाऊनलाLockdown शिथिलता दिली आहे. आजच याबाबतीत राज्य सरकारची बैठक होती त्यामध्ये तर हॉटेल आणि मॉल रात्री १० पर्यंत उघडे ठेवण्याबाबत परवानगीPermision दिली आहे. मात्र सरकार एकीकडे लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शिथिलता देत असतानाच दुसरीकडे मात्र मुंबई महापालिकेनेBMC कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरं जाण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.Restrictions relaxed in Mumbai; But the danger of the third wave remains
हे देखील पहा-
मुंबईत एकीकडे निर्बंधामध्ये शिथीलता दिली जात असली तरी दुसरीकडे महापालिकेने कोरोनाच्या तिस-या लाटेची जय्यत तयारी सुरू ठेवली आहे. आणि यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीत तिस-या लाटेच्या सज्जतेसाठी कोट्यावधींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईतील जम्बो कोविड Jumbo Covid Center सेंटरमधील औषधांसाठी २० कोटी ७२ लाखांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कांदीवलीत ६३ बेडचं अद्ययावत कोविड सेंटर पुन्हा सुरु केले जाणार असून कोविड वॉर्डसाठी साडेआठ कोटींपर्यंतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेलीय. परंतु २० कोटी रूपयांची औषध खरेदी ही मागील वेळेपेक्षा ज्यादा दराने केल्याचा आरोप विरोधकांनी केला महापालिकेवरती केला आहे.
तसेच जर तिसऱ्या लाटेचीThird Wave एवढी दाट शक्यता असेल तर मग मुंबईमध्ये गर्दी करण्यासाठी परवानगीच का दिली जात आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
Edited By-Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.