मुंबई : मागील आठवड्यापासून मुंबईतीमधील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत तसेच आता रेस्टाँरंट, माँल आणि दुकानांची वेळ वाढवावी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सTask Force आणि रेस्टाँरंट मालक संघटनांशी चर्चा झालेली आहे शिवाय आज कँबिनेटमध्ये या संदर्भात आणखी चर्चा होणार आहे असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.Restaurants, malls and shops in Mumbai will be extended
हे देखील पहा-
तसेच या वेळा किती वाढतील याबाबतचा निर्णय पुढील १ किंवा २ दिवसात जाहीर होईल असही पालकमंत्री शेख म्हणाले शिवाय लॉकडाऊनLockdown टप्याटप्याने शिथिल करणं योग्य ठरेल अन्यथा जी परीस्थिती आता केरळमध्ये आली आहे ती आपल्याडे येऊ शकते म्हणून प्रत्येक निर्णय घेताना आपल्याला जपून पावले उचलावी लागणारं आहेत असही अस्लम शेखAslam Shekh यांनी सांगितलं.
नाईट लाईफ अशक्य
लोकांना फिरण्यासाठी मुंबई 24 तास ओपन ठेवण्याचा आमचाच मानस होता पण मध्येच कोरोना संकट आल्याने हा निर्णय अधांतरी राहिला त्यामुळे सध्या तरी सध्या नाईट लाईफNight Life शक्य नसल्याचही शेख यांनी स्पष्ट केलं. तसेच मॉलMall मध्ये कामWorkers करणारे कर्मचारी लोकांना ज्यांचे 2 डोस झाले आहेत त्यांना कामावरती जायला हरकत नाही असही ते म्हणाले.
राज्य सरकारवर नको केंद्रावर प्रेशर करा
शिवाय आता मुंबई मध्ये लोकल मध्ये गर्दी होणारच कारण ज्यांना कामाला जायचं त्यांची गर्दी होणं हे स्वाभाविक आहे. तसेच प्रत्येक रेल्वेस्टेशन बाहेर ऑफलाईन सुविधाही सुरु केली असून ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत ते लोक तिथे जाऊन लोकलचे तिकीट काढू शकतात. तसेच आम्ही केंद्र सरकारकडे अधीक लसींची मागणी सातत्याने करत आहोत आणि राज्यातील विरोधकांनी राज्य सरकारला प्रेशर करायच्या ऐवजी केंद्रावर प्रेशर करुन राज्यासाठी लसींची मागणी करावी असा सल्लावजा टोलाही विरोधी पक्षाला पालकमंत्र्यांनी लगावला.
Edited By-Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.