Kalyan, Kalyan-Dombivli Municipal Corporation News saam tv
मुंबई/पुणे

KDMC News : 27 गावांच्या न्याय हक्कासाठी 20 एप्रिलला कल्याण डोंबिवली महापालिकेवर धडक मोर्चा : सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा निर्धार

यापुर्वी देखील नागरिकांनी याच मुद्द्यासाठी महापालिका कार्यालयावर माेर्चा काढला हाेता.

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Kalyan-Dombivli Municipal Corporation News : कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांमध्ये मालमत्ता करात दहापटीने वाढ केल्याचा आरोप सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीने केला. हा कर रद्द करून 2015 च्या कर आकारणीनुसार करण्यात यावा अशी मागणी समितीने केली आहे. (Maharashtra News)

गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत पाठपुरावा करून देखील महापालिकेने कर वाढ कमी न केल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने 20 एप्रिलला महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनात मालमत्ता कर कमी करण्याच्या मागणीसह 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करणे ,ग्रोथ सेंटर रद्द करणे ,भाल ,भोपर गावातील डम्पिंग ग्राउंड रद्द करणे, भूमिपुत्रांनी स्वतःच्या गरजेपोटी केलेली सर्व बांधकामे नियमित करणे, आरोग्य व शिक्षण व्यवस्था सदृढ करणे अशा मागण्या मांडणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील (सचिव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

Reshma Shinde : अभिनेत्री रेश्मा शिंदे आई तुळजाभवानीच्या दर्शनाला, पाहा फोटो

दारूच्या नशेत तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला, ट्रॅकमनने वेळीच बाहेर खेचलं; कर्मचारी रविकुमार यांचं सर्वत्र कौतुक

SCROLL FOR NEXT