भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर २६ जानेवारी रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम आज सकाळी झाली. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी रामचंद्र धनावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस उपयुक्त मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आज झालेल्या रंगीत तालमीत भारतीय नौदल, गोवा पोलीस पथक, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक, गृहरक्षक दल पुरुष व महिला, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क पथक, वनरक्षक दल, मुंबई अग्निशामक दल, मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, ठाणे व मुंबई शहर, उपनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ पथक, राष्ट्रीय सेवा योजना, सी कॅटेगरी प्राप्त एनएसएस पथक, भारत स्काऊट गाइड मुले व मुलींचे पथक, पोलीस ब्रास बॅण्ड, राज्य राखीव पोलीस बलाचे पाइप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस मोटार सायकल पथक, निर्भया वाहन पथक, नौदलाच्या पी -२१, आर -६१ मिसाईल, यांच्यासह अन्य विभाग, शाळांच्या सहभाग घेतला. तसेच, राज्य शासनाच्या १८ विभागांनी जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह तालमीत सहभाग घेतला. (Latest Marathi News)
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या १ मे २०२३ रोजी झालेल्या महाराष्ट्र दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निखिल गुप्ता यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्य राखीव पोलीस बल पथकास प्रथम, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियत्रंण पथक द्वितीय तर बृहन्मुंबई महिला पोलीस बलास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.