Reliance Industries AGM 2022| मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोमवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वात मोठी घोषणा केली. या बैठकीत त्यांनी जिओ 5G नेटवर्कवर अधिक भर दिला.
यावर्षी दिवाळीपासून देशातील महानगरांसह अनेक प्रमुख शहरांत जिओची ५ जी नेटवर्कची सुविधा मिळण्यास सुरुवात होईल, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले.
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सांगितले की, 'दोन महिन्यांनंतर दिवाळी येत आहे. या निमित्त दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या महानगरांसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये जिओची ५ जी सेवा सुरू करण्यात येईल.
त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील अन्य शहरांमध्ये वेगाने विस्तारण्यात येईल. फक्त १८ महिन्यांत म्हणजेच डिसेंबर २०२३ पर्यंत जिओची ५ जी सेवा देशातील सर्व तालुका पातळीवर सुरू होईल.'
'जिओकडून देण्यात येणारे ५ जी नेटवर्क नॉन स्टँडअलोन ५ जी नेटवर्क असेल. ते लेटेस्ट व्हर्जन आहे. जगातील सर्वात वेगवान नेटवर्कही उपलब्ध करून दिले जाईल. हे केवळ सर्वात अॅडव्हान्स नसेल तर, सर्वात मोठे ५ जी नेटवर्क असणार आहे. हे संपूर्ण नेटवर्क केवळ ५ जी बँडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल, त्यासाठी ४जीची कुठलीही मदत घेतली जाणार नाही,' असे मुकेश अंबानी यांनी सांगितले.
यूजर्सना तीन पट फायदा
मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओचे हे अॅडव्हान्स ५ जी नेटवर्क यूजर्सला चांगला अनुभव देईल. या ५ जी सेवेच्या माध्यमातून उत्तम कव्हरेज, क्षमता, गुणवत्ता आणि स्वस्त नेटवर्क उपलब्ध करून दिले जाईल. या ५ जी नेटवर्कद्वारे मशीन टू मशीन कम्युनिकेशन्स खूपच सोपे होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.