'जिओ फायबर'चा धमाका

'जिओ फायबर'चा धमाका
Published On

मुंबई : ग्राहकांवर सवलतींची खैरात करून मोबाईल सेवा क्षेत्रात जम बसवल्यानंतर 'रिलायन्स इंडस्ट्रीज'ने दूरध्वनी सेवा, वेगवान इंटरनेट आणि उच्च दर्जाच्या दूरचित्रवाणी सेवेकडे (केबल) मोर्चा वळवत सुरु केलेल्या जिओ फायबर सेवेला आजपासून (5 सप्टेंबर) सुरवात होत आहे.

जिओ फायबर'च्या प्रवेशाने आता दूरध्वनी सेवा आणि केबल सेवेत व्यावसायिक युद्ध भडकण्याची शक्‍यता आहे. रिलायन्स समूहातील मोबाईल सेवा पुरवठादार 'जिओ'ला बळ देऊन 'जिओ फायबर' ही कंपनी ग्राहकांना अमेरिकेपेक्षाही वेगवान इंटरनेट सेवा आणि नि:शुल्क दूरध्वनी सेवा देईल, असा दावा रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केला होता. रिलायन्स समूहाच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी 'जिओ फायबर'ची घोषणा केली होती. वर्षभरापासून "जिओ गिगाफायबर'ची चाचणी सुरू होती. सध्या पाच लाख घरांमध्ये 100 जीबीपेक्षा जास्त डेटा वापरला जात आहे. यासोबत दूरध्वनी सेवाही दिली जाणार आहे.

'जिओ गिगा फायबर'च्या माध्यमातून एक जीबी प्रतिसेकंद वेग, फोन, सेट टॉप बॉक्‍स आणि अनेक स्मार्ट डिजिटल सोल्यूशन्स ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. 

'जिओ फायबर'च्या सेवा 
- दरमहा 700 रुपये ते 10 हजार रुपये शुल्क 
100 एमबी प्रतिसेकंद ते एक जीबी प्रतिसेकंद इंटरनेट स्पीड 
- घर, कार्यालय, लहान मोठे उद्योजक तसेच कंपन्यांना सेवा 
- जिओ फायबर जोडणीसाठी ऑनलाइन नोंदणी 
- जिओ इंटरनेट टीव्ही, दूरध्वनी सेवा, व्हिडिओ कॉलिंगसाठी जिओ चॅट सेवा 

'फर्स्ट डे फर्स्ट शो' 
रिलायन्सने 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची घोषणा करत सिनेमागृहात लागलेला चित्रपट 'फर्स्ट डे फर्स्ट शो' घरूनच बघता येणार आहे. जून 2020पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. रिलायन्स जिओ 'एमआर' डिव्हाईस बाजारात आणणार असून, ऑनलाईन कपडे परिधान करून कसे दिसतात ते ग्राहकांना पाहणे शक्‍य होईल. रिलायन्स जिओचे देशभरात 34 कोटी ग्राहक आहेत. 

Web Title: Jio Fiber Plans Set-Top Box Landline Service and More to Launch Today

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com