Eknath shinde  ANd Devendra fadnavis
Eknath shinde ANd Devendra fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

तरुणांसाठी खुशखबर! शिंदे-फडणवीस सरकारकडून ७५ हजार रिक्त पदांची भरती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : राज्यातील तरुण वर्गासाठी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) आनंदाची बातमी दिली आहे. राज्यभरातील ७५ हजार रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. शिवाय दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. (Recruitment of 75 thousand vacancies)

या ७५ हजार रिक्त पदांच्या मेगा भरती परीक्षेसाठी विशेष संस्था नेमणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय विशेष संस्थेची निवड प्रक्रिया पुढील कॅबिनेटमध्ये पार पडणार आहे असून रेल्वे व केंद्रीय परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत मेगाभरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे.

पाहा व्हिडीओ -

राज्यात सुमारे दीड लाख शासकीय व निमशासकीय रिक्त पदे असून त्यापैकी ७५ हजार पदे वर्षभरात भरली जातील, अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मागेच विधान परिषदेत केली होती त्यानुसार आता राज्य सरकारने ही मेगाभरती प्रत्यक्षात करण्याची घोषणा आता केली आहे. त्यामुळे राज्यभरतील नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

SCROLL FOR NEXT