Navale Bridge Acident
Navale Bridge Acident  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यातल्या नवले पुलाजवळ इतके अपघात का होतात? धक्कादायक कारण समोर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Accident : पुण्यात अपघातच सत्र काही थांबायचं नाव घेत नाही आहे. रविवारी भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री त्याच परिसरात आणखी दोन अपघात झाले. पुण्यात (Pune Accident) रात्रभरात एकूण ३ अपघात झाले आहे. मात्र, पुण्यातल्या नवले पुलाजवळ इतके अपघात का होतात याचं नेमकं कारण आता समोर आलं आहे. (Pune Navale Bridge Accident Latest Update)

कात्रज नवीन बोगदा संपल्यानंतर दरी पुलापासून महामार्गावर तीव्र उतार सुरू होतो. या उतारावरून येताना वाहनचालक डिझेल वाचविण्यासाठी वाहने बंद करून तीव्र उतारावरून भरधाव येतात. उतार संपल्यानंतर अनेकदा वाहनांना ब्रेक लागत नाही, त्याचवेळी अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागतो.

अवघ्या 2 तासात 3 मोठे अपघात

ब्रेक निकामी झालेल्या भरधाव टँकरने ४८ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्री आणखी दोन अपघात झाले.यात सुमारे 25 ते 26 गाड्या एकमेकावर आदळल्या आणि सुमारे ६ ते १० जण जखमी झाले आहेत. जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनरमधील ऑईल रस्त्यावर सांडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. 

नवले ब्रिजच्या भीषण अपघातानंतर स्वामी नारायण मंदिराजवळ दुसरा भीषण अपघात झाला. या अपघातात सात गाड्यांना टेम्पोने उडवले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर कात्रज रस्त्यावर दुचाकीचा तिसरा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी

या तिन्ही अपघातामुळे जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली. नवले पुलापासून पाठीमागे कात्रज नवीन बोगद्याच्या पलिकडे पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात वाहने सापडलेल्या नागरिकांनी खासगी वाहने करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तर मुंबई, गुजरात व उत्तर भारतात जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. दरम्यान, अग्निशामक अधिकारी, वाहतूक पोलीस पोलिस, "एनएआयए"चे कर्मचारी घटनास्थळी आले. अग्निशामक जवानांनी रस्त्यावर सांडलेले तेल, राडारोडा, बाजूला करून पाण्याचा वापर करून रस्ता साफ करून घेतला. त्यानंतर बराच वेळाने कोंडीत अडकलेली वाहने सोडण्यास सुरुवात केली.

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान, या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT