Nana Patole
Nana Patole Saam Tv
मुंबई/पुणे

राजकीय द्वेषापोटी फोन टॅपिंग; खरा सूत्रधार कोण हे उघड व्हावे : नाना पटोले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील बहुचर्चित असलेलं फोन टॅपिंग प्रकरणावर तपास सुरु आहे, या प्रकरणी राज्यातील नेत्यांचे जबाब नोंदवून घेण्यात येत आहेत. आज काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांचाही जबाब नोंदवून घेतला. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी या प्रकरणातील खरा सुत्रधार कोण आहे हे उघड करण्याची मागणी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) सरकारच्या काळात राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे हे फोन टॅपिंग केले होते. हे फोन टॅपिंग केवळ राजकीय द्वेषापोटी करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणामागचा खरा सुत्रधार कोण हे उघड झाले पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी आज केली आहे.

'फोन टॅपिंगप्रकरणी (Phone tapping) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आज माझा जबाब नोंदवला. माझे फोन रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवले, तो आवाज माझाच होता. शेतकरी आंदोलन विषयक माझी भूमिका या रेकॉर्डिंगमध्ये होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणाला केलेला विरोध यात होता. कोर्टात चार्जशीटमध्ये याची नोंद येईल. हे फोन टॅपिंग करताना आपले नाव अमजद खान ठेवून ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचे कारण दिले होते, असंही नाना पटोले म्हणाले.

माझ्याकडे एकच फोन नंबर असून राजकीय व सामाजिक जीवनात वावरताना मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारणच नाही, ‘कर नाही तर डर कशाला?’. चुकीचे कारण देत दोनदा फोन टॅपिंगची परवानगी घेतली गेली. यामागचा खरा सुत्रधार कोण हे उघड झाले पाहिजे. आणि चौकशीतून ते बाहेर येईल असा मला विश्वास आहे, असेही पटोले (Nana Patole) म्हणाले.

Edited By - Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT