Virat Kohli’s RCB Finally Wins IPL Trophy in 2025 
मुंबई/पुणे

RCB wins IPL : पुण्यात RCB समर्थकांचा जल्लोष, एफसी रोडवर राडा, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

Virat Kohli IPL trophy 2025 : १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCBने IPL 2025 चषक जिंकला. विराट कोहलीच्या संघाने पंजाबवर ६ धावांनी विजय मिळवला. पुण्यात जल्लोषाचा माहोल, पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव हटवला.

Namdeo Kumbhar

RCB IPL 2025 winner : विराट कोहलीच्या आरसीबीने अखेर आयपीएल चषकावर नाव कोरलं. आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीने श्रेयस अय्यरच्या पंजाबचा ६ धावांनी पराभव करत चषकावर नाव कोरलं. आयपीएलला यंदा नवा विजेता मिळालाय. आरसीबीने १८ व्या वर्षी चषकावर पहिल्यांदाच नाव कोरल्यानंतर देशभरात एकच जल्लोष पाहायला मिळाला. बंगळुरूपासून ते पुण्यापर्यंत चाहत्यांनी जल्लोष केला. पुण्यामध्ये रात्री १२ वाजता आरसीबीचे चाहते जमले होते. आरसीबीच्या चाहत्यांनी फटके उडवत आणि घोषणाबाजी करत विजय साजरा केला. पुण्यात मोठ्या प्रमाणात आरसीबीचे चाहते जमले होते, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.

२००८ मध्ये आयपीएल पर्वाला सुरुवात झाली, पण १७ वर्षांमध्ये आरसीबीला चषकावर नाव कोरता आले नव्हते. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आरसीबीने फायनलमध्ये धडक मारली होती, पण स्वप्न अपुरेच राहिले होते. रजत पाटीदारच्या नेतृत्वातील आरसीबीने अखेर यंदा इतिहास रचला. १८ व्या वर्षी आरसीबीने चषकावर नाव कोरले अन् चाहत्यांचा आनंद गगणात मावला नाही. पुण्यात ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. एफसी रोडसह पुण्यातील अनेक रस्त्यावर शेकडो तरूण जमले होते. फटाक्या आणि विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.

आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाच्या विजयानंतर पुणे शहरात ठिकठिकाणी RCB चाहत्यांनी जल्लोष केला. विशेषतः फर्ग्युसन रस्त्यावर गुडलक चौक परिसरात आरसीबी चाहत्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले. त्याशिवाय एफसी रोडवरही चाहते मोठ्या प्रमाणात जमले होते.

जल्लोषाच्या नावाखाली रस्त्यावर सुरू असणाऱ्या या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. हुल्लडबाजी करणाऱ्या आणि रस्ता रोखून धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांना पोलीस समजावत होते. परंतु काही युवक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव हटवला आणि वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज वाशिम बाजार समिती राहणार बंद, अडत्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकले

Government Employees: मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ३० दिवसांची भरपगारी सुट्टी

Kitchen Tips: फ्रिजची गरजच नाही! पावसाळ्यात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स वापरा

Buldhana: शेतामध्ये गेले पण परत आलेच नाहीत, शेतकरी पती-पत्नीची आत्महत्या; बुलडाण्यात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडकीला रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट मिळणार, खात्यात ₹१५०० जमा होणार

SCROLL FOR NEXT