Rayate accident kalyan murbad road saam tv
मुंबई/पुणे

Rayate Accident: ५ वर्षांपूर्वी पतीचं निधन, आता नियतीनं लेकरं हिरावली; रायते पुलावरील अपघातात ३ मुलांच्या मृत्यूनं माऊली कोसळली

Rayate pul accident : पतीच्या निधनानंतर रोजच्या जगण्याशी संघर्ष करणारी एक आई नियतीपुढं हरली. रायता पुलावरील अपघातात तिनं आपली तिन्ही लेकरं गमावली. अपघातात तिन्ही मुलांच्या मृत्यूनं या संघर्ष करणाऱ्या मातेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही | कल्याण

५ वर्षांपूर्वी नियतीनं तिच्यापासून पतीला हिरावून घेतलं. पदरी तीन मुलं...या तिघांच्या पालनपोषणाची आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी खांद्यावर आली. पण ती अजिबात खचली नाही. डगमगली नाही. तिचा रोजच्या जगण्याशी संघर्ष सुरू झाला. चार घरची धुणीभांडी करून आणि शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून मुलांच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न तिनं बघितलं. पण या संघर्षमयी आईचे स्वप्न एका अपघातानं बेचिराख केलं. पाच वर्षांआधी पतीच्या निधनानंतर लेकरांकडं बघून पहिला आघात पचवणाऱ्या मातेवर दुसरा आघात झाला. कल्याण-मुरबाड-नगर मार्गावरील रायतेजवळच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात या मातेनं आपली तिन्ही लेकरं गमावली.

कल्याण-मुरबाड मार्गावरील रायते पुलावर काल, सोमवारी भीषण अपघात झाला. सिमेंट मिक्सर आणि प्रवासी व्हॅन यांच्यात झालेल्या धडकेत ११ जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त प्रवासी व्हॅन ही कल्याणहून प्रवाशांना घेऊन मुरबाडच्या दिशेने निघाली होती. मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांमध्ये मोहपे कुटुंबातील भाऊ आणि दोन बहिणी अशा तिघांचाही समावेश आहे.

अंजना मोहपे या मूळच्या मुरबाड तालुक्यातील. पऱ्हे हे त्यांचे गाव. सध्या हे मोहपे कुटुंब ठाण्यातील दिव्यात राहतं. नेहा मोहपे (वय १९), मानसी (वय २२) आणि प्रथमेश (वय १५) ही तिन्ही मुले उन्हाळ्याची सुट्टी आणि घरातील एका लग्नासाठी गावी जात होते. दिव्याहून ते कल्याणला पोहोचले. तिथून ते मुरबाडमधील गावी जाण्यासाठी प्रवासी व्हॅनमध्ये बसले. अर्ध्या तासाच्या अंतरावर गेल्यानंतर रायते पुलावर सिमेंट मिक्सरला त्यांची व्हॅन धडकली. यात या तिघांसह ११ जणांचा मृत्यू झाला.

अंजना मोहपे यांचे आयुष्य आधीपासूनच संघर्षमय राहिलेले आहे. पाच वर्षांपूर्वी पती लक्ष्मण यांचे आजाराने निधन झाले. त्यानंतर घरकाम करून त्यांनी आपल्या पाच मुलांचे संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी उचलली. मोठी मुलगी निकिता हिचे लग्न झाले असून अंकिता आणि मानसी या पदवीधर आहेत.

नेहा हिने नुकतीच १२वीची परीक्षा दिली होती, तर प्रथमेशने दहावी परीक्षा दिली होती. अपघातात मानसी, नेहा आणि प्रथमेशला त्यांनी गमावलं. अपघात झाल्याचे त्यांना समजले. काहीतरी विपरीत घडल्याने आपल्याला मुलांना भेटू दिले जात नाही असे त्यांनी जाणले आणि त्या खालीच कोसळल्या. त्या तिघांचेही मृतदेह बघून कुटुंबीयच नव्हे तर गावातील ग्रामस्थांनीही हंबरडा फोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कंपनीच्या बॉयलरचा स्फोट; १० कामगारांचा होरपळून मृत्यू, ४० जखमी

Mumbai Tourism : मुंबईहून फेरीने सहज पोहचा ‘या’ सुंदर ठिकाणी, उन्हाळ्यात वॉटर स्पोर्ट्सचा घ्या आनंद

Maharashtra Live News Update: शहापूरमध्ये तापमान ४३ अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

माजी मंत्र्याचे निधन; भाजपच्या अष्टपैलू नेतृत्वाचा तीन दशकांचा प्रवास थांबला, राजकारणात शोककळा

Weight Loss Recipe : बीटापासून बनवा 'हा' हेल्दी पदार्थ, जिमला न जाता वजन होईल कमी

SCROLL FOR NEXT