Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; तर डॉ. सुरेश गोसावी यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

निवृत्ती बाबर

Pune News: पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद गेल्या वर्षभरापासून रिक्त होते. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी गेल्या वर्षभरापासून प्रकिया सुरू होती. आज अखेर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ रवींद्र कुलकर्णी व डॉ सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. राज्यपालांनी डॉ संजय घनश्याम भावे यांची डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.

डॉ रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ संजय भावे हे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

कोण आहेत रवींद्र कुलकर्णी?

रवींद्र कुलकर्णी हे मुंबईतील माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) प्राध्यापक होते. तसेच या संस्थेतील विभागप्रमुख पदावर कार्यरत होते.

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या काळात डॉ रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून कारभार सांभाळला आहे. त्यामुळे डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचं कुलगुरू निवडीच्या शर्यतीत पारडं जड मानलं जात होतं.

कोण आहेत डॉ. सुरेश गोसावी?

डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. गोसावी यांनी एमएस्सी. पीएच. डी. पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत.

डॉ. गोसावी यांचे प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी हे संशोधनाचे विषय होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

LPG Gas Crisis : गॅस टंचाईचं संकट टळणार; इराणनं दिली भारतासाठी गुड न्यूज

5 कोटी नोकऱ्या जाणार? नोकऱ्यांवर AI आणि युद्धाचं सावट, वाचा खास रिपोर्ट

Blouse Designs: उन्हाळ्याच्या सीझनसाठी खास कॉटन ब्लाउज, पहा शानदार फॅन्सी डिझाइन्स

मुंबईत LPG काळाबाजारावर शिधावाटप विभागाची धाड! वरळीत साठेबाजीचा भंडाफोड; मोठा साठा जप्त

SCROLL FOR NEXT