Ravindra Chavan Latest News  Saam tv
मुंबई/पुणे

Ravindra Chavan Latest News : आनंद परांजपेंशी बोलून नाराजी दूर करू : मंत्री रवींद्र चव्हाण

Ravindra Chavan on Anand Paranjpe : अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी शिंदे गटाला इशारा दिला होता. यावरून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Ravindra Chavan Latest News :

राज्यात सर्वच राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीचे वेध लागले आहेत. महायुतीतील पक्षांनीही आगामी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील अजित पवार गट आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी शिंदे गटाला इशारा दिला होता. या सर्व राजकीय घडामोडीवरून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभा लढवणार असल्याचे विधान केलं, त्यानंतर आनंद परांजपे यांनी कल्याण लोकसभेत दाखवून देऊ असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत होतं, याविषयी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रत्येक कार्यकर्त्याला एकत्र येऊन काम करावं हे वारंवार सातत्याने सांगत असून समन्वय साधत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'मी स्वतः आनंद परांजपे यांच्याशी चर्चा करेल. त्यांनी जी काही नाराजी व्यक्त केली आहे. ती नक्कीच येणाऱ्या काळात दूर करू. त्यांच्यासोबत समन्वय साधत आनंद परांजपे यांची समजूत काढणार आहे, असे चव्हाण म्हणाले.

आचारसंहितेवर रवींद्र चव्हाण काय म्हणाले?

येत्या दोन दिवसात आचारसंहिता लागतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. त्यावेळी सर्वच्या सर्व गोष्टी मी सांगितल्या तर आपण याकडे निवडणुकीचा भाग म्हणून पाहाल म्हणून आज विकास कामांची माहिती देतोय, असे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विकास निधीचा पाढा वाचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer- Deepika Daughter : कोणासारखी दिसते रणवीर- दीपिकाची लेक, Inside फोटोज् पाहा

Maharashtra Politics: महायुतीतील वाद चव्हाट्यावर; भाजप आमदाराची शिंदेंच्या आमदारावर शिवराळ भाषेत टीका|VIDEO

महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची ६ वाहनांना धडक, तिघांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Best Bus Accident : बेस्ट बसला भीषण अपघात; पुढच्या भागाचा चक्काचूर, ब्रिजवर नेमकं काय घडलं?

दगडूशेठ गणपती मंदिरात महिला भाविकांना १० रुपयांची ओवाळणी भेट|VIDEO

SCROLL FOR NEXT