Rohini Khadse Enters Court In Lawyer's Robe Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rave Party: नवऱ्याला वाचवण्यासाठी रोहिणी खडसेंनी अंगावर चढवला वकिलीचा कोट, कोर्टात नमकं काय घडलं?

Rohini Khadse Enters Court In Lawyer's Robe: पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी रोहिणी खडसे वकिलीचा कोट घालून कोर्टात उपस्थित होत्या.

Bharat Jadhav

  • पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक

  • पत्नी रोहिणी खडसे यांनी वकिलाचा कोट घालून न्यायालयात बचावासाठी हजेरी लावली

  • खडसे कुटुंबीयांनी राजकीय सूडाचा आरोप केलाय

  • रोहिणी खडसे अॅक्शन मोडमध्ये, पोलिसांकडून तपशील घेतले

पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आलीय. आज त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. डॉ. प्रांजल खेवलकर यांना अडविण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांनी केलाय. याप्रकरणी रोहणी खडसे अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत.

काल त्यांनी पोलिसांची भेट घेत प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, याबाबत माहिती घेतली. आता आपल्या पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे ह्यांनी अंगावर वकिलीचा कोट चढवला. त्या सुनावणीदरम्यान, पुणे न्यायालयात वकिलीचा कोट घालून हजर होत्या.

पतीसाठी अंगावर चढवला वकिली कोट

खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणी प्रांजवल खेवलकरांसह इतर सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. ही कोठडी आज संपल्यानंतर त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात रोहिणी खडसे यादेखील दिसल्या. खडसे यांनी कायद्याचे शिक्षण घेतलंय. त्या खुद्द एक वकील आहेत. त्यामुळे आपल्या पतीच्या सुटकेसाठी त्यादेखील प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोहिणी खडसे आज न्यायालयात वकिलीचा कोट घालून आल्या होत्या.

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना सुनावणी आणि घडलेल्या प्रकरणाविषयी प्रश्न केले. परंतु हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे यावर काही बोलू शकत नाही. परंतु योग्यवेळी मी माझी भूमिक मांडेन असं रोहिणी खडसे न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर म्हणाल्या.

पोलीस कोठडीची मागणी

तपास अधिकारी यांनी पुरुष आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केलीय. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीप्रमाणे, तपासात राहुल नावाचा नवीन व्यक्ती असल्याची माहिती मिळालीय. तो हुक्का भरण्याच काम करत होता. त्याचा शोध घ्यायचाय. अंमली पदार्थ कोठून आणले याबाबत आरोपी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

त्यासाठी त्यांच्याकडे चौकशी करायचीय. सातपैकी अटक असलेल्या दोन महिला आरोपींची पोलीस कोठडी सध्या गरजेची नाहीये. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. मात्र पाच पुरुष आरोपींकडे आणखी चौकशी करायची असल्याने त्यांच्या पोलीस कोठडी करण्यात यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केलीय.

इशा सिंगच्या मदतीने प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आलं

प्रांजल खेवलकरांकडून वकील विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयात आपली बाजू मांडताना ते म्हणाले की, दोन महिला आरोपींकडे अंमली पदार्थ देऊन प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आले. इशा सिंग हिच्या पर्समधे सिगारेटच्या रिकाम्या पाकीटात कोकेन सापडलं आहे. इशा सिंगला प्लांट करण्यात आले होते. पोलीस आता त्या दोन महिला आरोपींना पोलीस न्यायालयीन कोठडीची मागणी करत आहेत. आणि प्रांजल खेवलकर यांची पोलीस कोठडी मागत आहेत. विशेष म्हणजे प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थांच सेवन केलेले नाहीये. त्यांच्याकडे अंमली पदार्थ सापडलेले देखील नाही, असं ठोंबरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT