Pune Shocking: 'आई-बाबा माफ करा'! ७ व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी IT इंजिनिअर पियुषची भावनिक चिठ्ठी

IT Engineer Jumps From 7th Floor: पुण्यातील हिंजवडीत एका आयटी अभियंत्याने आत्महत्या केलीय. कंपनीच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या पालकांची माफी मागणारे एक हृदयस्पर्शी पत्र लिहिलंय.
Pune Hinjewadi IT Engineer
IT Engineer Jumps From 7th Floorsaam Tv
Published On
Summary
  • पुणे हिंजवडी येथे एका आयटी इंजिनिअरने कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

  • आत्महत्येपूर्वी पियुष कवडे यांनी आपल्या आई-वडिलांना एक भावनिक चिठ्ठी लिहून माफी मागितली होती.

  • या चिठ्ठीतून त्याच्या मानसिक तणावाचे संकेत मिळाले आहेत.

  • पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून चौकशी सुरू आहे.

गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी

पुणे हिंजवडी येथील एका आयटी इंजिनियरने ७ मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. कंपनी असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून त्याने जीवन संपवलं. याप्रकरणी एक नवी अपडेट समोर आलीय. आत्महत्या करण्यापूर्वी पियुष कवडे याने आपल्या आई-वडिलांना भावनिक चिठ्ठी लिहिली होती. त्यात आपण त्याने आई-वडिलांची माफी मागितलीय.पुणे पोलिसांनी या सुसाईड नोट खुलासा केला असून या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, असं सांगितलंय.

आज सकाळी दहा वाजेण्याच्या सुमारास हिंजवडीतील ॲटलास कॉपको ग्रुप या कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या पियुष अशोक कावडेनं आत्महत्या केली. कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून त्याने आपलं जीवन संपवलं. पियुषने टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनाही पडलाय.

Pune Hinjewadi IT Engineer
Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

दरम्यान पोलिसांना पियुषनं लिहून ठेवलेली एक सुसाईड नोट सापडलीय. त्या नोटमध्ये त्याने आई-वडिलांची माफी मागितलीय. मी चांगला मुलगा होण्यासाठी पात्र नाही. मी अपयशी झालो. जास्त चौकशी करू नका! एक संदेश लिहून पियुषने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पोलिसांकडून सर्वा नातेवाईकांकडून विचारपूस केली जात आहे.

पियुष कवडे याला कामाचा ताण होता का या बाजूने पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. पियुष नैराश्यात होता का? याचाही पोलिसांकडू तपास केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी हिंडवडी वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी माहिती दिलीय. हिंडवडी फेज १ मधील अॅटलास कॉपको कंपनीत पियुष कावडे हा एक ते दीड वर्षांपासून आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होता.

त्याने कंपनीच्या टेरसवरून उडी मारून आत्महत्या केलीय. त्याने एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात त्याने आई-वडिलांची माफी मागितलीय. आपण चांगला मुलगा होऊ शकलो नसल्याचं त्याने म्हटलंय. तरीही आपण या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कुऱ्हाडे यांनी दिलीय.

दरम्यान पियुष अशोक कवडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पियुष अशोक काडे हा मूळचा नाशिकचा जिल्ह्यातील रहिवाशी होता. तो मागील दीड वर्षापासून हिंजवडी आयटी पार्क परिसरातील ॲटलास कॉपको ग्रुप या कंपनीत अभियंता पदावर कार्यरत होता. आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्याने कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com