Ratnagiri Building Collapsed Saam TV
मुंबई/पुणे

Ratnagiri Building Collapsed : मोठी बातमी! रत्नागिरीतील खेडमध्ये दुमजली इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली, पाहा VIDEO

Ratnagiri Khed Two floors Building Collapsed : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात असलेली दुमजली इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली, या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Satish Daud

खेड रत्नागिरी : रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. खेड शहरात असलेली दुमजली इमारत कोसळली आहे. मंगळवारी (ता. २५) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झालेली नाही. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील हमदुले चाळ येथे दुमजली इमारत होती. खेड नगरपालिकेने ही मे महिन्यात ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती. यानंतर इमारत पूर्णत: खाली करण्यात आली. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही इमारत कोसळली आहे.

सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या तसेच दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे घाटमाथ्यावर येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT