Mumbai-Goa highway Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Goa Highway: रत्नागिरी - मुंबई- गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक ठप्प

Bharat Jadhav

Mumbai-Goa Highway:

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे दरड कोसळली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. दरडीमुळे वाहतूक कोंडी झालीय. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासात मोठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. (Latest News)

ट्रेनमध्ये अडकले प्रवासी

काल दुपारी 3 वाजता झालेल्या अपघातानंतर मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी काही एक्सप्रेस ट्रेन सोडण्यात आल्या. यावेळी उत्तरेकडून देखील काही एक्सप्रेस ट्रेन आल्या. सध्या १७ ते १८ ट्रेन गेल्या १३ तासांपासून एकाच ठिकाणी उभ्या आहेत. गेल्या १२ ते १३ तासांपासून प्रवासी ट्रेनमध्येच अडकले आहेत. सध्या नावडे रोड रेल्वे स्थानकात दादर-सावंतवाडी ही एक्सप्रेस ट्रेन उभी आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

गणपती उत्सवाची सांगता झाल्याने शहराकडे आणि सलग सुट्ट्यांमुळे गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळेच मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली असून मोठी वाहतुक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर बोरगाव घाटात ट्राफिक जाम झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT