Diva Station News: मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत; संतप्त प्रवाशांचा रेल रोको

Rail Roko On Diva Station: संतप्त प्रवाशांनी रेल्वे सेवा ठप्प केली असून दिवा रेल्वे स्थानकातून कोकणच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर रेलरोको करण्यात आला आहे.
Panvel News
Panvel NewsSaamtv

Diva Railway Staion:

गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. प्रवाशांना वेळेत गाड्या मिळत नसल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आजही चाकरमान्यांना गाड्या नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला, ज्यानंतर संतप्त प्रवाशांनी रेल्वे सेवा ठप्प केली असून दिवा रेल्वे स्थानकातून कोकणच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर रेलरोको करण्यात आला आहे.

Panvel News
Pune Accident: हृदयद्रावक! भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; भीषण अपघातात बाप- लेकीचा करुण अंत

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशोत्सव आटोपून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. काल कोकणात जाणार्‍या गाड्या उशिराने धावत होत्या. आजही तशीच परिस्थिती असून पनवेल (Panvel) येथे माल गाडीच्या अपघाताचा फटका आज कोकणवासीयांना बसला.

आजही दिवा रेल्वे स्थानकातून सावंतवाडीकडे जाणारी पॅसेंजर वेळेवर सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांना दिवा रेल्वे स्थानकातून कोकणाचा दिशेने जाणार्‍या फलाटावर रेल्वे रोको करून नाराजी व्यक्त  केली.

प्रवाशांचा संताप...

सीएसएमटीपासून ठाण्यापर्यंत काल रात्रीपासून लोक उभे आहेत. गाडी सुरु होणार नव्हती मग रेल्वेने तिकीट कशाला द्यायची. रात्रभर आम्ही वाट पाहत होतो. रेल्वेकडून सातत्याने गाडी सुरु होईल, सुरु होईल सांगण्यात येत होतं. मात्र अद्यापही ट्रेन सुरु झालेली नाही. वंदे भारत ट्रेन जाऊ शकते आमची कोकणातील ट्रेन का जाऊ शकत नाही, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

Panvel News
Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, एका वक्तव्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com