Ramdas Athawale Saam TV
मुंबई/पुणे

रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु; तसे संदर्भ असल्याचा आठवलेंचा दावा

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) मात्र राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तर महाराजांचे गुरु हे समर्थच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या शिवाजी महाराज आणि समर्थांबाबतच्या वक्तव्याने राज्यतील राजकीय राजकीय वातावरण चांगलचं तापलं असून राज्यपालांनी हे वक्तव्य मागे घ्यावं तसेच त्यांनी माफी मागावी यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. तर खुद्द भाजपनेते याबाबत चुप्पी साधून असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) मात्र राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तर महाराजांचे गुरु हे समर्थच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

रामदास स्वामींची महाराजांना मार्गदर्शन होते -

पिंपरी चिंचवड महानरगपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन करण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ' छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) संदर्भात राज्यपाल काय म्हटले, ते तपासायला हवं. मला वर्तमानपत्र वाचून जे समजले त्यावरून समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांवरून वाद सुरू झाला आहे. मात्र, राज्यपालांच्या व्यक्तव्याचा विपर्यास केला जात असून समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. त्यांना रामदास स्वामी (Ramdas Swami) यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन होते. त्यावरून शिवरायांचे रामदास गुरू होते, असे संदर्भ असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, राज्यपालांनी माफी मागायला हवी का या प्रश्नांवर आठवले म्हणाले, '' माफी मागण्याचा प्रश्न कुठे येतो.'' असे राज्यपालांचे समर्थन केंद्रीय मंत्री आठवले यांनी केले आहे.

राज्यपाल काय म्हणाले होते ?

चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही त्याप्रमाणे समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं. मात्र, आपण छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) कमी लेखत नसल्याचही ते म्हणाले होते. उलट शिवाजी महाराजच समर्थांना म्हणाले होते, 'तुमच्या आशिर्वादाने राज्य मिळालं' असही राज्यपाल औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.

Edited By -Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT