Maharashtra Politics saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : महायुतीत सर्वात मोठा पक्ष अन् मुख्यमंत्री कोणाचा? आठवलेंचं वक्तव्य अन् पुन्हा चर्चांना उधाण

Ramdas athawale News: महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले केला आहे. रामदास आठवले यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुतीचा अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या विधानसभेआधी महायुतीत सर्वात मोठा पक्ष कोण आणि मुख्यमंत्री कोणाचा असेल, यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं भाष्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा पक्ष असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं भाष्य केलं. रामदास आठवले म्हणाले, 'शिर्डी आणि नगर जागा आम्हाला दिल्या असत्या, तर निवडून आल्या असत्या. आमच्या पक्षाच्या तिकिटावर आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात. स्मारक झाल्याने जीवनात नाही, पण मनात बदल होत असतो. महायुतीमधे सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चागलं काम करत आहेत. अनेक निर्णय घेत आहेत'.

'महायुतीमध्ये ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री अस करायला हवं. पण आमच्यात तसे नाही. आम्ही सर्व बसून ठरवू. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यास विरोध दिसतोय. लोकसभेत उद्धव ठाकरे यांचे उमेदवार कमी निवडून आले आहेत, असेही ते म्हणाले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले, 'गणेशोत्सव राज्यभर सुरु आहे. स्वतंत्र्य लढ्याला बळकटी यावी म्हणून लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरु केला आहे. आज राज्यभरात गणेशोत्सवात साजरा केला जातो. आज मी पुण्यातील गणेशोत्सवांना भेट देऊन दर्शन घेणार आहे. देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे. मोदींच्या नेतृत्वात सरकार चांगले काम करत आहे. देशातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा पंतप्रधान मोदींची प्रामाणिक इच्छा आहे'.

'देशात अनेक योजना सुरू आहेत. ५३ कोटी लोकांची अकाऊंट बँकेत उघडण्यात आले होते. गॅस सिलिंडरला जातो उज्वल योजनेअंतर्गत काम सुरू आहे. गरिबी नष्ट करण्यासाठी आम्हाला शेत आहे. नोकरी देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही १० लाख लोकांना नोकरी दिल्या आहेत. लोकसभेत आम्हाला अपयश आलं. लोकसभेच्या वेळी संविधानाबाबत अफवा पसरवण्यात प्रयत्न विरोधकांनी केल्या. आम्हाला ४० जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. पण आम्हाला 17 जागाच मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलन फटका आम्हाला बसला आहे. पण विधानसभेत विकासाचा मुद्दा चालेल. १० टक्के आरक्षणाचा उच्चवर्णीयांना फायदा होत आहे. हे राज्य सरकारने दिलं आहे. त्याबाबत फायदा होत आहे, असे आठवले म्हणाले.

'ओबीसीमधून आरक्षण मागणी रास्त आहे. परंतु आरक्षण मिळणं अवघड आहे. सारखं आंदोलन करून धमकी देऊ नये. विचार विनिमय करून मार्ग काढावा. आरपीआयला विधानसभा निवडणुकीत आम्हाला १० ते १२ जागा मिळाव्यात, अशी मागणी आहे. आमचा पक्ष छोटा असला तरी आम्हला जागा दिल्या जाव्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT