Ram Kadam Saam Tv
मुंबई/पुणे

Ram Kadam: काहीही झाले तरी थाटात गुढीपाडवा, राम नवमी साजरी करणार, राम कदमांचा निर्धार

हे सरकार हिंदूविरोधी का आहे, याचा जाब सरकारला द्यावा लागेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: तुमचे निर्बंध घाला चुलित म्हणत भाजप प्रवक्ता राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमिवर मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये रोष आहे. भाजप प्रवक्ता राम कदम यांनी याबाबत संतप्त असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे (Ram Kadam Wrote To CM Uddhav Thackeray Says That They Will Celebrate Gudi Padwa).

सातत्याने हिंदू सणांना विरोध करणार्‍या महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) सद्बुद्धी यावी म्हणून गुढीपाडवाच्या दिवशी मंत्र घोषित विधीवत हवन करणार असल्याचंही राम कदम (Ram Kadam) यांनी सांगितलं आहे.

काहीही झाले तरी वाजत गाजत थाटात ढोल ताशा सहित गुढीपाडवा, राम नवमी (Ram Navami) प्रत्येक हिंदू साजरा सण साजरे करणारच, तुमचे निर्बंध घाला चुलित, अशा शब्दात राम कदमांनी मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहित आव्हान दिलं आहे.

हिंदू सणांवर निर्बंध लादू नका. अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे. हे सरकार हिंदूविरोधी का आहे, याचा जाब सरकारला द्यावा लागेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

विरोधकांकडून सरकारच्या निर्बंधावर टीका

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू केली आहे. त्यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षातील आशिष शेलार, प्रसाद लाड यांनी सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.

राम भक्तांवर ठाकरे सरकारचा राग आहे कळत नाही. जेव्हा-जेव्हा हिंदू सण येतात, तेव्हा परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का, असा संतप्त सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. तसेच, राम जन्माला देखील मिरवणुका निघतात. पण, याच्या परवाणगीची स्पष्टता नाही. मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. त्याला कारण दिले आहे की आतंकवादी ड्रोन किंवा इतर माध्यमाचा वापर करुन हल्ला करणार आहे, असंही आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT