Gudi Padwa 2022: गुढीपाडव्यावरील निर्बंध हटण्याची शक्यता, पाहा गृहमंत्री काय म्हणाले

लवकरच मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
 Dilip Walse-Patil
Dilip Walse-PatilSaamTV
Published On

मुंबई: गुढीपाडवा आणि त्यानिमित्त निघणाऱ्या शोभा यात्रेवरील निर्बंधांवरुन विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. निर्बंधाबाबतचे निर्णय मदत आणि पुर्नवसन विभाग घेते. पोलिसांना तसे आदेश द्यायचे झाले, तरी मदत आणि पुर्नवसन विभागाची परवानगी घ्यावी लागते. लवकरच मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

भाजप (BJP) बेरोजगारी, महागाई यावरुन जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप हे जातीय राजकारण करत असल्याची टीका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केली.

विरोधकांकडून सरकारच्या निर्बंधावर टीका

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू केली आहे. त्यावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षातील आशिष शेलार, प्रसाद लाड यांनी सरकारच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे.

राम भक्तांवर ठाकरे सरकारचा राग आहे कळत नाही. जेव्हा-जेव्हा हिंदू सण येतात, तेव्हा परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का, असा संतप्त सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. तसेच, राम जन्माला देखील मिरवणुका निघतात. पण, याच्या परवाणगीची स्पष्टता नाही. मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. त्याला कारण दिले आहे की आतंकवादी ड्रोन किंवा इतर माध्यमाचा वापर करुन हल्ला करणार आहे, असंही आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

प्रसाद लाड यांचे मुंडण

गुढी पाडवा, राम नवमी शोभा यात्रेला परवानगी न दिल्याने भाजप नेते प्रसाद लाड यांनी मुंडण करत सरकारचा निषेध नोंदवलाय.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com