Ram Kadam Saam Tv
मुंबई/पुणे

Ram Kadam: महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिन्दू सणांना विरोध का, राम कदमांचा होळी नियमावलीला विरोध

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: कोरोनाचे (Corona) निर्बंध (Restrictions) कमी झाले असले, तरीदेखील होळी आणि धुलिवंदनाकरिता राज्य सरकारने (State Government) नवी नियमावली घोषित केली आहे. हे नियम पाळावे लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. याला आता भाजपा प्रवक्ता राम कदम यांनी विरोध केला आहे.

"महाराष्ट्र सरकारचा (Maharashtra Govt) एवढा टोकाचा हिन्दू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत. आहो तुम्ही घाबरट असाल, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत. काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिन्दू सण जल्लोषात साजरा करणारच", असं म्हणत राम कदम (Ram Kadam) यांनी सरकारच्या नियमावलीला आव्हान दिलं आहे.

होळीसाठी सरकारची नियमावली काय

- रात्री 10 वाजेच्या आत होळी करावी

- 10 च्या आत होळी लावणे बंधनकारक

- डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर बंदी

- होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई

- महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी

- दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये, जोरात लावल्यास कारवाई

- कोणत्याही जाती, धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये

- होळीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18 : 'बिग बॉस'च्या प्रोमोचा व्हिडिओ आला; सलमान खानचं 'भविष्य' दिसलं!, VIDEO बघा

200MP कॅमेरा, 12 जीबी रॅम; 12000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत

AC Disadvantages : २४ तास AC मध्ये असता? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Astrology: ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक असतात भाग्यवान, तुमचा बर्थडे कधी?

October Heat: ऑक्टोबर हिटमध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

SCROLL FOR NEXT