Ayodhya Ram Mandir  Saam Tv
मुंबई/पुणे

Ram Mandir Invitation: राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देताना कोणती अट ठेवण्यात आली होती? समोर आली महत्वाची माहिती

Ram Mandir Invitation News: राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मंदिराच्या न्यास समितीने दिलं आहे. या न्यास समितीने नेमकं सोहळ्याचं निमंत्रण देताना कोणती अट ठेवली होती, याची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, मुंबई

Ram Mandir Invitation Card :

अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला देशभरातील मोठे नेते, क्रिकेटर, सेलिब्रिटींना निमत्रंण देण्यात आलं आहे. या सोहळ्याचे निमंत्रण रामजन्मभूमी ट्रस्टने दिलं आहे. या समितीने सोहळ्याचं निमंत्रण देताना नेमकी कोणती अट ठेवली होती, याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

राम मंदिर सोहळ्यासाठी रामजन्मभूमी ट्रस्टने निवडणूक आयोगाकडून यादी घेऊन देशातील नोंदणीकृत पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना निमंत्रणे आली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

या सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून निमंत्रण आले आहे, तर अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून निमंत्रण आले आहे. त्याच न्यायाने राष्ट्रवादीच्या दुसर्‍या गटाचे प्रमुख म्हणून शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्याचप्रकारे इतर राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

रामजन्मभूमी ट्रस्टकडून क्रिकेट, सिनेमा, उद्योग इत्यादी क्षेत्रातील सेलिब्रिटींना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, देशातील कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून निमंत्रण देण्यात आलेलं नाही. तसेच केवळ राजशिष्टाचाराचा भाग म्हणून उत्तरप्रदेशात कार्यक्रम होत असल्याने तेथील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

भाजपाचे निमंत्रण हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. याशिवाय, 8000 निमंत्रितांमध्ये मोठा घटक हा देशभरातील संत-महंतांचा आहे. त्यात महाराष्ट्रातून अशा 409 संत-महतांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT