Chandrakant Handore Saam Tv
मुंबई/पुणे

RajyaSabha Election 2024 : काँग्रेसकडून राज्यातून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी, चार नावे जाहीर

Maharashtra Political News : काँग्रेसने राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेश सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनू सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

Pramod Subhash Jagtap

Rajyasabha Election 2024 :

राज्यसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. राज्यातून काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी दिली आहे. याबाबतचं पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संमतीने जनरल सेक्रेटरी के सी वेनुगोपाल यांनी काढलं आहे.

काँग्रेसने राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेश सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनू सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चंद्रकांत हांडोरे यांची मागील विधानपरिषद निवडणुकीत पराभूत झाले होते. तरीही पक्षाने पुन्हा चंद्रकांत हांडोरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना संधी दिली आहे. काँग्रेसनं यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत हांडोरे?

चंद्रकांत हांडोरे हे मुंबईमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. आंबेडकरी चवळवळीतही त्यांचे प्रस्थ आहे. मात्र विधानपरिषदेत त्यांना दगफटका झाला आणि ते पराभूत झाले होते. मात्र आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्याने त्यानी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहे.

अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणीही जाणार नाही. पक्षश्रेष्ठी यांनी दगाफटका होणार नाही याची काळजी घेतील तर नक्की राज्यसभा निवडणूक जिंकू, असं चंद्रकांत हांडोरे यांनी म्हटलं.

सोनिया गांधी यांनी अर्ज भरला

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आज सोनिया राजस्थानची राजधानी जयपूरला पोहोचल्या. राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT