Pune News
Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Rajya Sabha Election 2022: धनंजय महाडीक यांचा 'विजय'; पुण्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

गोपाळ मोटघरे

राज्यसभेच्या ६ जागांसाठीचं काल मतदान (शुक्रवारी) पार पडलं. भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीचा (Election 2022) निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. यात भाजपने दिलेला तिसरा उमेदवार निवडून आला असून शिवसेनेला (Shivsena) पराभवाचा सामना करावा लागला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपचे धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यानंतर पुण्यात भारतीय जनता पक्षाकडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. पुण्यातील कसबा गणपती समोर भाजपाचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष साजरा करत आहे. ये तो एक झाकी है, विधानपरिषद बाकी है, देवेंद्र फडणीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. अशी घोषणाबाजी करीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. तर धनंजय महाडीक हे विजयी झाल्याने भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरल्याचे मानले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Patil News : आम्ही सतत पाठिंबा द्यायला बसलेलो नाही, राजू पाटील यांचा महायुतीला इशारा?

Summer Skin Care: या घरगुती उपायांनी होईल काळी त्वचा गोरी

Today's Marathi News Live : रत्नागिरी- दिवा पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड

Heat Wave in Maharashtra : मे महिना 'ताप'दायक ठरणार, राज्यात उष्णतेची लाट येणार

Andheri Fire: ब्रेकिंग! अंधेरी पंप परिसरात भीषण अग्रितांडव; दारूचे दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT