Devendra Bhuyar Saam Tv
मुंबई/पुणे

'मविआ स्थापन झाली नव्हती, तेव्हापासून...'; पवारांच्या भेटीनंतर भुयारांनी स्पष्टच सांगितलं

महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केल्याच्या आरोपानंतर आज देवेंद्र भुयार यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यसभेतील शिवसेनेच्या (Shivsena) पराभवानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर आरोप केला होता. संजय राऊत यांनी निवडणूकीत दगाबाजी करणाऱ्या अपक्ष आमदारांची नावेही जाहीर केली. यात राऊत यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावरही आरोप केले होते. संजय राऊत यांच्या आरोपानंतर आज देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रीया दिली.

देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) आज अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी, संजय राऊत यांच्या बद्दल शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यासठी गेले होते. ''मी संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सोबत राहून निवडून आलो आहे, मग मी गद्दारी कशी केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र भुयार म्हणाले, महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलला बैठक झाली, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार होते. या बैठकीत मी माझी खंत बोलून दाखवली. त्यामुळे निवडणुकीत जे झालं त्याचे खापर माझ्यावर फोडले जात आहे. याबाबत मी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.

मी माझी सर्व बाजू शरद पवार (Sharad Pawar) यांना सांगितली आहे. यावेळी याबाबत काही तरी गैरसमज झाला आहे, असं शरद पवार म्हणाले, ते संजय राऊत यांच्याशी बोलणार आहेत असंही देवेंद्र भुयार म्हणाले. मी देखील आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बोलणार आहे. पराभवाचे अशा पद्धतीने आमच्यावर खापर फोडल्याने लोकांमध्ये प्रतिमा खराब होईल, त्यामुळे मी लगेच मतदार संघात जाऊन पुन्हा मुंबईत आलो आहे, मी मुख्यमंत्र्यांची देखील वेळ मागितली आहे. आता निधी मिळाला नाही तरी चालेल, असंही भुयार म्हणाले.

विकास कामाच्या निधावर बोलताना भुयार म्हणाले, आम्ही आमच्या कामासाठी निधी मागत नाही. लोकांच्या कामासाठी निधी लागतो. महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi ) स्थापन झाली नव्हती., तेव्हापासून मी राष्ट्रवादीसोबत आहे, असंही देवेंद्र भुयार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makhana Benefits: रोज संध्याकाळी भूक लागल्यावर मखाना खल्ल्याने शरिराला मिळतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात साडेचौदा हजार विद्यार्थी आज नीटची परीक्षा देणार

Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT