Raj Thackray  Saam TV
मुंबई/पुणे

मनसेचं एकमेव मत भाजपला मिळणार? आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला

भाजप नेते आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) मतदानासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक उरले आहेत. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे. सहावी जागा जिंकण्यासाठी अपक्ष आमदारांची मदत महत्वाची ठरणार आहे. अशातच भाजप (BJP) नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. (Rajya Sabha Election Latest News)

कृष्णकुंजवर भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावरून चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे. बैठकीला मनसे आमदार राजू पाटील देखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आशिष शेलार अचानक राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसे राज्यसभेत भाजपला मतदान करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

काय म्हणाले आशिष शेलार?

"मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटलो, पक्षाच्या वतीने राज्यसभेसाठी मनसेच असलेलं एक मत भाजपला मिळावा यासाठी विनंती केली, आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आमच्या विनंतीला मान दिला ते भाजपला मत पडेल" असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणण्याकरिता 15 तर भाजपला 20 मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष व अपक्ष अशा 29 मतांवर शिवसेना व भाजपची भिस्त असेल. यातूनच ‘घोडेबाजार’ म्हणजेच आमदारांना वश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यातूनच भाजप की शिवसेनेचा अतिरिक्त उमेदवार पराभूत होतो वा काँग्रेसला फटका बसतो याची उत्सुकता असेल.

विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेना 55, राष्ट्रवादी 53 आणि काँग्रेस 44 अशी महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांची 152 मते आहेत. भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 29 आमदार आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj : 'आईविना जगण किती अवघडं असतं' धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT