Rajya Sabha Election: बिनविरोध होणारी निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता Saam Tv
मुंबई/पुणे

Rajya Sabha Election: बिनविरोध होणारी निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता

राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होणारी राज्यसभेची (Rajyasabha Election) निवडणुक लढवण्याचा निर्णय भाजपने (BJP) घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होणारी राज्यसभेची (Rajyasabha Election) निवडणुक लढवण्याचा निर्णय भाजपने (BJP) घेतला आहे. त्यामुळे बिनविरोध होईल असा अंदाज असलेली ही निवडणुक आता चुरशीची होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे एप्रिल महिन्यात निधन झालं होतं. त्यानंतर या जागेसाठी निवडणुक प्रक्रिया आता पार पडत आहे.

२२ सप्टेंबर पर्यंत या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असुन ॲाक्टोबर मध्ये निवडणुक पार पडणार आहे. काँग्रेस कडून उमेदवारीसाठी राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव इच्छुक आहेत. तर याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची देखील चर्चा आहे. ही निवडणुक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे.

राज्यसभेतलं पक्षीय बलाबल लक्षात घेता ही निवडणुक कॅांग्रेससाठी महत्वाची आहे. संख्याबळाच्या गणितासाठीही निवडणुक महत्वाची समजली जात आहे. अनेक नेते रिटायर होणार असल्याने कॅांग्रेसला सभागृहात अनुभवी नेत्यांची गरज आहे. भाजपने उमेदवार उभा न करता निवडणुक बिनविरोध करण्याचं कॅांग्रेसचं समोर आवाहन आहे. भाजप मात्र २२ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: किडनी निकामी झाल्यास त्वचेवर दिसतात हे ६ गंभीर बदल, वेळीच व्हा सावध

राज्यात 21 दिवसांत 50 भूकंप; दोनच जिल्ह्यांमध्ये का होतोय वारंवार भूकंप?

महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात; तरूण उद्योजकासह दोघांनी जीव गमावला, १८ सेकंदाचा VIDEO बघून थरकाप उडेल!

Manoj Jarange: 29 ऑगस्टला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत? अवैध दाखल्यांमुळे जरांगेंचा इशारा, जरांगे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढवणार?

Pune Municipal Corporation: पुणेकरांचे 254 कोटी खड्ड्यात; महापालिका-कंत्राटरांच्या अभद्र युतीतून लूट?

SCROLL FOR NEXT