rajveer belkar saam tv
मुंबई/पुणे

'बाप्पा' च्या विसर्जनासाठी गेलेल्या सहा वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू; नातेवाईकांचा महापालिकेवर राेष

महानगरपालिकेने बांधलेल्या विसर्जत घाटामध्ये सहा वर्ष मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेने शहरातील हिरा घाट येथे बनवलेल्या विसर्जन (ganesh visarjan) घाटात शनिवारी एका सहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजवीर नितीन बेलेकर (वय सहा) असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. (Ulhasnagar Latest Marathi News)

बेलकर कुटुंबीय हे हिराघाट भैयासाहेब आंबेडकर सोसायटी येथे वास्तव्यास आहे. दुपारी चार वाजता राजवीर बेपत्ता झाला. त्यास सर्वत्र शोधत असताना शनिवारी रात्री दहा वाजता त्याचा विसर्जन घाटातील पाण्यामध्ये मृत्यूदेह सापडला. महानगरपालिकेने बांधलेल्या या विसर्जत घाटामध्ये सहा वर्ष मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

पालिकेच्या अनास्थेमुळे ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. जोपर्यंत या घटनेप्रकरणी दोषीवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा

Manoj Jarange : मोठी बातमी! मुंबईनंतर आता मराठे थेट दिल्ली गाठणार, मनोज जरांगे यांची घोषणा

Mumbai Tourism: विकेंड ट्रीपचा प्लान करताय? मुंबईतील 'या' सुंदर ठिकाणांना द्या भेट, दूर होईल कामाचा ताण

पैठण हादरलं! पंचनाम्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या धमकीने शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं|VIDEO

Gorakhpur Student Case : विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या गोतस्कराचा पोलिसांकडून एन्काऊंटर; दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT